हिरो मोटो जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत करणार वाढ I Hero Moto Corp to hike prices from January 2022 I

हिरो मोटो जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत करणार वाढ

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्प ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२२ पासून कंपनी इनपुट खर्चातील वाढ अंशतः कमी करण्याच्या हेतूने त्यांच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या शोरूम मधील किमतींमध्ये वाढ करणार आहे.

कंपनीने माहिती दिली कि “कमोडिटीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने त्याची भरपाई करण्यासाठी किमतीत सुधारणा करणे आवश्यक आहे.” रु.२,०००/- पर्यंत हि वाढ होईल आणि दर वाढीचे अचूक प्रमाण मॉडेल व मार्केट वर अवलंबून असेल.

BSVI उत्सर्जन मानक लागू झाल्यानंतर खर्चात वाढ झाल्यामुळे दुचाकींच्या विक्रीवर आधीच दबाव आला आहे. गेल्या महिन्यात स्थानिक बाजारपेठेत दुचाकींची विक्री सुमारे ६% ने घटून ९.१ दशलक्ष युनिट्सवर आली आहे. मारुती सुझुकीने सांगितले की ते नवीन वर्षात पुन्हा वाहनांच्या किमती वाढवतील. कंपनीने पोर्टफोलिओमध्ये केलेली ही चौथी किंमत वाढ आहे.

कमोडिटीच्या जास्त किमतीमुळे कंपनीने केलेली ही चौथी किंमत वाढ असेल. मारुती सुझुकीने सप्टेंबर, एप्रिल आणि जानेवारी २०२१ मध्ये पुन्हा किमती वाढवल्या होत्या.

एप्रिल/मे २०२० मध्ये स्टीलच्या किमती रु.३८/- रुपये प्रति किलोच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रु.७७/- रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत. तांब्याच्या किमती $९७०० प्रति टन ने वाढल्या आहेत. ऍल्युमिनिअम च्या किमती प्रति टन $२७००-२८०० पर्यंत वाढल्या आहेत.

hero price hike
hero price hike

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *