सोभा लिमिटेडची ३८७०/- कोटींची विक्री I Sobha Ltd sales of Rs. 3,870/- Crore I

सोभा लिमिटेडची ३८७०/- कोटींची विक्री

रिअल इस्टेट कंपनी सोभा लिमिटेडला विक्रीत २३% ची वाढ

बंगलोर मधील रिअल इस्टेट कंपनी सोभा लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ आर्थिक वर्षात विक्रीत २३% ची वाढ झाली असून एकूण रक्कम रु. ३८७०.२/- कोटी आहे. होम लोन वरील व्याज दर कमी झाल्याने घर खरेदीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. तिमाहीचे अहवालानुसार, बुकिंग मध्ये २२% ची वाढ झाली असून ४९,०९,५६७ स्क्वेअर फिट आहे व बुकिंग व्हॅल्यू रु. ३८७०.२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत ४०,१३,५८१ स्क्वेअर फिट ची विक्री झाली होती व बुकिंग व्हॅल्यू ३१३७.२/- कोटी होती. २०२२ आर्थिक वर्षात सर्वाधिक विक्री झाल्याचे कंपनीने सांगितले. बंगलोर मध्ये कंपनीने ३३,५३,२५० स्क्वेअर फिट ची विक्री केली आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्ट अनारोक च्या मते, ७ शहरामध्ये विक्रीत ७१% ची वाढ झाली आहे.

sobha ltd April 2022
sobha ltd April 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *