सर्वात श्रीमंत महिला – रोशनी नाडार मल्होत्रा ५४८५० कोटी रुपयेI

सर्वात श्रीमंत महिला – रोशनी नाडार मल्होत्रा ५४८५० कोटी I

कोटक महिंद्रा बँकेचा कोटक वेल्थ मॅनेजमेंट हा विभाग आणि हुरून इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोटक वेल्थ हुरून – लीडिंग वेल्दी विमेन’च्या दुसऱ्या आवृत्तीच्या लाँचची घोषणा करण्यात आली.

३० सप्टेंबर २०२० रोजी असलेल्या महिलांच्या संपत्तीवर ही यादी आधारीत आहे. यात एचसीएल टेक्नाॅलाॅजीच्या प्रमुख रोशनी नाडार मल्होत्रा या अव्वल स्थानी असून त्यांची मालमत्ता ५४८५० कोटी आहे. यादीत दुसऱ्या स्थानी बायोकाॅनच्या संस्थापक किरण मझुमदार शाॅ असून त्यांची संपत्ती ३६६०० कोटी आहे. तर तिसऱ्या स्थानी मुंबईत फार्मा कंपनी यूएसव्ही प्रा. लि.च्या लीना गांधी असून त्यांची संपत्ती २१३४० कोटी आहे.

अहवालाच्या २०२० च्या आवृत्तीमध्ये, ज्या महिलांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात सक्रिय भूमिका निभावलेली आहे, ज्या उद्योजक आहेत आणि व्यावसायिक आहेत, अशा महिलांवर भर देण्यात आला आहे.भारतीय महिलांनी केलेली संपत्ती निर्मिती समजून घेण्याचा हा आकडेवारीवर आधारीत करण्यात आलेला प्रयत्न आहे.

भारतातील आघाडीच्या १०० उद्योजक, प्रोफेशनल्स आणि व्यावसायिक महिलांच्या यशाचा सन्मान करण्यात आला आहे. या यादीतील महिलांची सरासरी संपत्ती २७२५ कोटी इतकी आहे. या यादीत मानांकन प्राप्त करण्यासाठी किमान संपत्तीची आवश्यकता १०० कोटी इतकी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *