श्री वैभव घोबाळे – उद्योजक घडवणारी फॅक्टरी – क्रांती उद्योजकता विकास केंद्र I अर्थसंकेत यशोगाथा I

श्री वैभव घोबाळे – उद्योजक घडवणारी फॅक्टरी – क्रांती उद्योजकता विकास केंद्र

वैभव बालाजी घोबाळे यांनी औरंगाबाद विद्यापीठातुन आपली बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली आहे. सुरवाती पासून मेहनती असलेल्या वैभव यांनी लातूर मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काही महिने काम केले. काम करत असताना उद्योजक शिबिराची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी मुंबई गाठली.

मुंबईतील टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, शहाड येथे त्यांनी १८ अठरा दिवसीय निवासी उद्योजकता शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. आज संपुर्ण महाराष्ट्रभर नामांकित कंपनी म्हणून वैभव घोबाळे यांची व्ही.जी. एंटरप्राइजेस ही कंपनी ओळखली जाते. या कंपनीच्या माध्यमातून लॅपटॉप विक्री केली जाते. यासोबतच वयाच्या 24 व्या वर्षी महिला बचत गट, पुरुष बचत गट, आर्थिक विकास महामंडळ यांसारखे सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले. तसेच लातूर जिल्हा उदयोग केंद्रात लातूर जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले.

उद्योजक बनू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना मार्गदर्शन करीत त्यांच्या उद्योग उभारणीकरीता विषेश प्रयत्न केले आणि त्या नवउद्योजकांना उद्योगाकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग सुलभ केला आणि यासाठीच KCED अर्थात ‘क्रांती उद्योजकता विकास केंद्राची स्थापना केली. KCED चे उद्घाटन मा.हर्षदिप कांबळे सर IAS(मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे विशेष अधिकारी तथा राज्याच्या उद्योग,ऊर्जा, कामगार मंत्रालयाचे सचिव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे. या कार्यक्रमास मा.निखील मेश्राम सर IRS (महामुंबई मेट्रो कार्पोरेशन ऑपरेशनचे फाईनन्स संचालक) व मा.विजय जाधव सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अगदी कमी कालावधीमध्ये KCED च्या उत्तम कामगिरीबद्दल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अर्थसंकेत-महाराष्ट्र गौरव २०२१० या पुरस्काराने KCED चे सर्वेसर्वा वैभव घोबाळे यांना गौरविण्यात आले.

KCED Contact – 7030275081

Vaibhav Ghobale
Vaibhav Ghobale

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *