विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देणारे BrightwayZ – श्री निकेतन तावरे I अर्थसंकेत यशोगाथा I

विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देणारे BrightwayZ – श्री निकेतन तावरे I अर्थसंकेत अर्थसंकेत यशोगाथा I

सहसा मुलं वडिलांचा वारसा चालवतात, म्हणजे त्यांचा उद्योग किंवा आवड पुढे जोपासतात, पण ह्या तरुणाने त्याचा आईचा वारसा पुढे नेण्याचे ठरविले आणि “BrightWayZ” या संस्थेची स्थापना केली. “BrightWayZ” अंतर्गत २०१४ साली MBA entrance आणि बँकेच्या परीक्षेसाठी मुलांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.

निकेतन तावरे ह्यांची आई सौ निर्मला प्रकाश तावरे ह्यांनी एम .कॉमची पदवी प्राप्त करून विठ्ठलवाडी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आणि २०१४ सालापासून ” BrightWayZ ” ची धुरा संचालिका म्हणून स्वीकारली.

निकेतन तावरे यांचा जन्म फलटण, सातारा येथे झाला. VJTI सारख्या प्रख्यात महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि मुंबई विद्यापीठातून MBA झाले. त्यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत समाज विकास अधिकारी म्हणून काम करीत असतं आणि आई विठ्ठलवाडी शाळेत शिक्षिका होती. अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना त्यांनी इंटर्नशिप केली आणि काही गुजराती मित्रांकडून ते एक अतिशय मोलाची गोष्ट शिकले, कि कधीही कोणत्याच एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहू नये. ह्या शिकवणीने त्यांना ” BrightWayZ ” ची निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले. तेव्हा आपण शिक्षण क्षेत्रातच पुढे काही मोठे करायचे त्यांनी ठरविले. आज या संस्थेच्या ७ शाखा मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे इथे आहेत आणि २०१४ ते २०२१ पर्यंत त्यांनी १०,००० विद्यार्थ्यांना शिकविले आहे.

MBA म्हंटले की अनेकांना वाटते की, ह्या शिक्षणासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात किंवा खूप जास्त अभ्यास असतो…पण ते फारसे खरे नाही. MBA entrance च्या विविध परीक्षा असतात जसे CAT, CET, SNAP NMAT, CMAT इत्यादी आणि ४ प्रक्रिया असतात. सर्वप्रथम CET, दुसरी Group Discussion, तिसरी Personal Interview आणि चौथी म्हणजे Document Verification . ह्या सर्व प्रक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. या सर्वांमध्ये ‘BrightWayZ’ विद्यार्थ्यांना मदत करते.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन आणि त्यांच्या आवडीनिवडीचे विश्लेषण करून त्यांना मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी MBA चे शिक्षण प्राप्त करून चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. मुलांना विविध कौशल्य ज्ञान दिले जाते. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन त्यांना दिले जाते म्हणून बहुतांश विद्यार्थी एम बी ए ची एंट्रन्स परीक्षा उत्तीर्ण होतात.

लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण शिक्षण पध्दत ऑनलाईन स्वरुपात करण्यात आली आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे विषय शिकवले जात आहेत. MBA साठी विविध शाखेत मुले शिकायला येतात. त्यात वाणिज्य, कला, विज्ञान , अभियांत्रिकी अशा विविध शाखेतल्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषय समजावून त्यांना माहिती द्यावी लागते . विद्यार्थ्यांना अनेक टेस्ट सीरिज दिल्या जातात. त्याचबरोबर ठाण्याच्या शाखेमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक स्टडीरूम निर्माण केलेली आहे.

लॉकडाऊनच्या या कठीण काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला अशा वेळेस ‘BrightWayz’ त्यांच्यासोबत उभे राहिले आणि त्यांना आर्थिक मदत केली. आज या संस्थेमध्ये पंचवीस ते तीस सदस्य कार्यरत आहेत .

‘BrightWayZ’ एक सामाजिक बांधिलकी म्हणून एसएनडीटी घाटकोपर आणि मुलुंड तसेच आर के टी महाविद्यालय उल्हासनगर येथे विद्यार्थिनीना मोफत शिक्षण देतात. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शासकीय, शैक्षणिक कर्जाबद्दल देखील ते माहिती देतात .

जर विद्यार्थ्यांला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन प्राप्त झाले आणि आर्थिक अडचण असल्यास एज्युकेशन लोनबद्दल मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फक्त तीस हजार रुपये इतकी फी शासनाने ठेवलेली आहे. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ घेता यावा म्हणून तावरे सर कार्यरत आहेत .

एमबीए सोबतच बँकांच्या विविध परीक्षेचा अभ्यास देखील ते विद्यार्थ्यांकडून करून घेतात. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची शाखा व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यांत क्लासेसचे ते टायअप करू इच्छितात.

तरुण पिढीला मार्गदर्शन करताना निकेतन सर म्हणतात की माणसाने कायमस्वरुपी विद्यार्थी राहिले पाहिजे नेहमी काही ना काही नवीन शिकायला हवे . त्याचबरोबर श्रमाला पर्याय नाही. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा देखील आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करायला हवा. निकेतन सरांच्या यशस्वी वाटचालीमध्ये श्री निलेश सरवटे, सुमेध समर्थ, ऍकेडेमिया ग्रुप, डी व्हाय पाटील सर, टाईम्स ऑफ इंडियाचे श्री विनायक चव्हाण, इंदिरा ग्रुप. भरत मोदी, मयूर शाह आणि शालिनी शाह, व्ही जे टी आयचे सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराचा मोलाचा वाटा आहे.

आज ‘BrightWayZ’ बारा क्षेत्रात तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात. रिअल ईस्टेट, रिटेल सेक्टर, आयटी सेक्टर, मीडिया, बँकिंग , शेअर मार्केट टुरिझम, फार्मा, एज्युकेशनल अशा विविध क्षेत्रांतील ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते.

शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आणि या यश प्राप्तीसाठी निकेतन तावरे सर आणि त्यांची टीम सर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. आज निकेतन सरांचे विद्यार्थी देशातल्या मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि कोणत्याही शिक्षकासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची प्रगती हाच खरा आनंद असतो आणि असा आनंद त्यांना नेहमी प्राप्त होवो हीच सदिच्छा .

Email id – brightwaysforcareers@gmail.com
Contact – 7710946409

शब्दांकन – सौ रचना लचके बागवे

Niketan Taware
Niketan Taware

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *