मोह – मायेच्या या दुनियेत – सौ रचना बागवे

मोह – मायेच्या या दुनियेत – सौ रचना बागवे

रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीचा आपल्यावर भडीमार होत असतो. जाहिरात बऱ्याचदा नक्कीच त्या वस्तू किंवा सेवे डे आपल्याला आकर्षित करतात.

आपण बाजारात किंवा हल्लीच्या मॉल संस्कृतीमध्ये खरेदी करायला गेलो कि २-३ महत्वाच्या वस्तू खरंतर आपल्याला खरेदी करायच्या असतात पण आपण कमीत कमी १५- २० वस्तू उचलून आणतो, ज्याचा आपण हिशोबच केलेला नसतो.

अमुक गोष्टीवर ‘Discount’ तमुक गोष्टी वर ‘एका वर एक फ्री’ अशा ऑफर असतात अशा अनेक मोहक ऑफर्सला आपण बळी पडतो आणि ९९ % वेळा घरी जास्त सामान घेऊन येतो. बऱ्याचदा आपल्या कडे तेव्हढे पैसेदेखील नसतात तर त्यावेळी Credit Cards आपल्या मदतीला धावून येतं. त्यावेळेस खरं तर उपयोगी आलेले Credit Cards महिन्या अखेरीस आपल्याला रडू आणत.

एकूण काय तर आपली खर्च करण्याची क्षमता नक्कीच वाढली आहे पण तेवढंच कर्ज घेण्याची सवयही.

आपण सध्या ना उपयोगी असलेल्या वस्तूसुद्धा कार्डांवर खरेदी करायला लागलेलो आहोत.

कर्ज बिलकुलच घेऊ नये अस नाही पण जसे आपण खर्च करतो, कर्ज काढतो तसं आपण नियमित बचत करून गुंतवतो देखील का ?

आपण आपल्या आजच्या सुखसोयींचा विचार करतो पण भविष्याचा खर्चाच काय ?

ज्या वेगाने आपण पैसे खर्च करतोय त्या वेगाने ते कमावतोय देखील का ?

आणि आपल्या सध्याचा व्यवसाय किंवा पगार या पटीने भविष्यात वाढणार आहेत का ? या सर्वांचा आपल्याला आजच विचार करावा लागेल.

आपल्याला इतर पण सोय आजच करावी लागेल ज्यामुळे जास्त पैसे घरी येतील कारण महागाई वाढतच राहणारी आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा तोल सावरायला आपल्याला योग्य गुंतवणुक करणे अतिशय गरजेचे आहे.

आजच गुंतवा आपल्या सुरक्षित उद्यासाठी.

कृपया आपल्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा. धन्यवाद.

आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ पुस्तक खरेदीसाठी संपर्क करा ९९३००२६०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *