माइंडट्रीला ४३७/- करोड निव्वळ नफा I Mindtree profit of Rs. 437/- Crore I

माइंडट्रीला ४३७/- करोड निव्वळ नफा

आयटी फर्म माइंडट्री ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४३७.५/- करोड आहे. मजबूत मागणी आणि ग्राहक संख्येत कंपनीने वाढ केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने रु. ३२६.५ /- करोड चा निव्वळ नफा कमावला होता.

बेंगळुरू-स्थित या कंपनीचा महसूल या तिमाहीत ३६% ने वाढून रु. २७५०/- करोड झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०२३.७/- करोड होती.
डॉलरच्या तुलनेत, निव्वळ नफा ३२.१% ने वाढून $५८.३ दशलक्ष झाला आहे, तर महसूल ३३.७% ने वाढून $३६६.४ दशलक्ष आहे.
डिसेंबर २०२१ च्या तिमाहीच्या शेवटी, कंपनीचे सक्रिय ग्राहक संख्या २६५ आहे. तिसर्‍या तिमाहीच्या शेवटी ३१,९५९ कर्मचारी होते आणि २१.९% गळती झाली आहे.

“तिमाहीकरीता ऑर्डर बुक मध्ये १४.६% ची वाढ झाली असून $ ३५८ दशलक्ष आहे आणि एकूण वार्षिक करार मूल्य अद्याप $ १.२ बिलियन आहे.
आमच्या भविष्यासाठी तयार कौशल्य विकास कार्यक्रम आणि आमच्या ग्राहकांचा विश्वास येत्या काही वर्षांत आम्हाला या क्षेत्रात एक चांगले स्थान निर्माण करण्यास मदत करेल. असे ते पुढे म्हणाले.

mindtree jan 22
mindtree jan 22

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *