महाराष्ट्र शासनाच्या बँकींग रेग्युलेशन कायदा सुधारणा समितीवर विश्वास ठाकूर यांची नियुक्ती I

महाराष्ट्र शासनाच्या बँकींग रेग्युलेशन कायदा सुधारणा समितीवर विश्वास ठाकूर यांची नियुक्ती

नाशिक – केंद्र शासनाने 2020 मध्ये बँकींग रेग्युलेशन कायदा 1949 मध्ये सुधारणा करून त्याअन्वये नागरी सहकारी बँकांवरील रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण वाढवले आहे. बँकींग रेग्युलेशन कायद्यामधील सदर बदलांचा राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजावर तसेच एकूणच बँकींग क्षेत्रावर कशा पद्धतीने परिणाम होईल, याबाबतचा अभ्यास करून त्यादृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे समिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीवर विश्वास को-ऑप बँक, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत तेरा मान्यवरांचा समावेश आहे. यात अध्यक्ष म्हणून सहकार व पणन मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील, सदस्य म्हणून महसूल मंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना.डॉ. राजेंद्र शिंगणे, ग्रामविकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक मंत्री मा.ना.अमित देशमुख, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री मा.ना. संदीपान भुमरे, मृद व जलसंधारण मंत्री मा.ना. शंकरराव गडाख, सहकार व कृषि मंत्री मा.ना.डॉ. विश्वजीत कदम, सहकार अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या. चे प्रशासक मा. विद्याधर अनास्कर तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक मा. अनिल कवडे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी विश्वास ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील विविध समित्यांवर यशस्वीपणे काम केले असून, सहकारातील आधुनिक बदलांसाठी, सुधारणांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सहकारातील विविध प्रश्‍नांची सोडवणूक करून विकास घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. भारतातील मोजक्याच सहकार नेतृत्वात त्यांचा नामोल्लेख केला जातो. त्यात माजी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई. माजी संचालक, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप.बँक्स अ‍ॅन्ड क्रेडीट सोसायटीज् लि. (नॅफकब, दिल्ली). माजी अध्यक्ष/कार्याध्यक्ष. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असो.मर्या. नाशिक. माजी विशेष निमंत्रित दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप.बँक्स फेडरेशन लि., मुंबई. युनो (दि युनायटेड नेशन्स जनरल अ‍ॅसेंब्ली)ने 2012 हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागाने एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीत संपूर्ण देशातून एकमेव ‘अशासकीय सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने सहकारी धोरणांचा आढावा घेणार्‍या सुखठणकर समितीमध्ये ‘सदस्य’ म्हणून नियुक्ती. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नागरी सहकारी बँकांच्या विविध कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी स्टडी ग्रुप या समितीवर ‘सदस्य’ म्हणून काम पाहिले.

मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विचारमंच सभेत ‘सदस्य’ म्हणून कार्य., यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), महाराष्ट्र शासन, पुणे येथे मा. महासंचालक यांनी सहकार विचार मंचच्या सभेवर त्यांची ‘सदस्य’ म्हणून नियुक्ती केली होती. स्वयंसहाय्यता गटांचे स्वसंवर्धन व विकास करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सहकारी बँकांकडून अर्थसहाय्य व बँकिंग सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी मा. सहकार आयुक्त यांनी कोअर ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपमध्ये विश्वास ठाकूर यांनी ‘सदस्य’ म्हणून कार्य. समाजातील दारिद्रय रेषेखालील व ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी ‘स्वयंरोजगार सहाय्यता गट’ ही योजना विश्वास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक महानगरपालिकेच्या मदतीने तातडीने कार्यान्वित केली होती. याबाबत मा. महानगरपालिका आयुक्तांनी गौरव केला आहे.

शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 जानेवारी 2011 रोजी नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद संपन्न झाली. मा. विश्वास ठाकूर हे परिषदेचे निमंत्रक होते. यात महाराष्ट्रातून सुमारे 2500 हून अधिक नागरी सहकारी बँकांचे चेअरमन, संचालक यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

विश्वास ठाकूर यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची पावती म्हणजे गेल्या 24 वर्षात त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यात विश्वास बँकेला 13 राष्ट्रीय, 21 राज्यस्तरीय, 9 जिल्हास्तरीय असे एकूण 43 पुरस्कार व विश्वास ठाकूर यांना 3 राष्ट्रीय, 17 राज्यस्तरीय, 23 जिल्हास्तरीय असे एकूण 43 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मा. विश्वास ठाकूर यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

vishwas thakur
vishwas thakur

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *