‘फ्लिपकार्ट’ची ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’च्या ‘ईडीईएल’बरोबर भागीदारी, अखेरच्या टप्प्यापर्यंत वितरणासाठी विद्युत वाहने उपयोगात आणण्याच्या प्रक्रियेला वेग I

फ्लिपकार्टची महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या ईडीईएलबरोबर भागीदारी, अखेरच्या टप्प्यापर्यंत वितरणासाठी विद्युत वाहने उपयोगात आणण्याच्या प्रक्रियेला वेग

2030 पर्यंत आपल्या ताफ्यात विद्युत वाहनांचे प्रमाण 100 टक्के करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, ‘फ्लिपकार्ट’ने या परिवर्तनास मदत करण्यासाठी ‘ईडीईएल’बरोबर केली भागीदारी.

·         ‘ईडीईएल’तर्फे देण्यात येते शाश्वत स्वरुपाची ‘एंड-टू-एंड वितरण सेवा;’ यामध्ये विद्युत वाहने, प्रशिक्षित चालक-वितरण प्रतिनिधी, चार्जिंग स्टेशन व ‘इंटीग्रेटेड टेक्नॉलॉजी-आधारित कंट्रोल टॉवर’ यांसारख्या पायाभूत सुविधांचा समावेश.

गळुरू / मुंबई, एप्रिल 2021 : देशभरातील आपल्या ‘लॉजिस्टिक्स’च्या ताफ्यात विद्युत वाहनांचा तातडीने समावेश करता यावा, या हेतूने फ्लिपकार्ट या कंपनीने महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. या कंपनीशी भागीदारी केली आहे. भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स बाजारपेठ असलेल्या ‘फ्लिपकार्ट’ने ही घोषणा आज केली. आपल्या ‘लॉजिस्टिक्स’च्या ताफ्यात विद्युत वाहनांचा शंभर टक्के समावेश करण्यास फ्लिपकार्ट कटिबद्ध आहे. 2030 पर्यंत या ताफ्यात 25 हजारांहून अधिक विद्युत वाहने समाविष्ट करण्याचे कंपनीचे धोरण आहे. या संदर्भात, महिंद्रा लॉजिस्टिक्स ही कंपनी विविध ओईएम कंपन्यांशी समन्वय साधेल आणि फ्लिपकार्टच्या शाश्वत संक्रमणाच्या प्रक्रियेत तिला मदत करेल. 

शाश्वत व्यवसाय पद्धतींबद्दल एकत्रित बांधिलकी व धोरण असलेल्या ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’ने 2020च्या उत्तरार्धात स्वत:चा ‘इलेक्ट्रिक डिलीव्हरी ब्रँड’ ‘ईडीईएल’ सादर केलेला आहे. भारतातील सहा शहरांमध्ये अखेरच्या टप्प्यांपर्यंत शाश्वत पद्धतीने वितरण करता यावे, याकरीता ‘ईडीईएल’ने ग्राहकोपयोगी वस्तू व ई-कॉमर्स या क्षेत्रांतील कंपन्यांसह भागीदारी केली आहे. ‘ईडीईएल’च्या माध्यमातून ‘एमएलएल’ ही कंपनी ‘फ्लिपकार्ट’साठी हरित पुरवठा साखळी उभारण्यास मदत करणार आहे. यामध्ये ती विद्युत वाहनांचा (ईव्ही) मोठा ताफा उपलब्ध करून देईलच, तसेच देशभरात ही वाहने तैनात करून त्यांद्वारे कामकाज करण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण करेल. नजीकच्या भविष्यात चार्जिंग स्टेशन व पार्किंगच्या जागा, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मार्गांचे नियोजन आणि अगदी ‘बॅटरी स्वॅपिंग स्टेशन’ यांसारख्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांची उभारणी हे सर्व यामध्ये अध्याहृत आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी व खर्च कमी करण्यासाठी ‘टॉवर ऑपरेशन्स’चे नियंत्रण व तंत्रज्ञान या दोन बाबीही यामध्ये महत्त्वाच्या आहेत.

‘फ्लिपकार्ट’ने या आधीच अनेक ‘ओईएम’शी भागीदारी केली आहे आणि आपल्या पुरवठा साखळीत दोन आणि तीन चाकी विद्युत वाहने सामावून घेतली आहेत. ‘एमएलएल’च्या ‘ईडीईएल’सह ‘फ्लिपकार्ट’ची भागीदारी झाल्याने या प्रक्रियेस आणखी गती येईल व राष्ट्रीय स्तरावर ती उभारण्यात मदत होईल. तसेच चार्जिंग, ट्रॅकिंग, मालमत्ता, सुरक्षा व खर्च यांच्याशी संबंधित तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा यांतूनही तिला बळ मिळेल. एमएलएलची विद्युत वाहने देशभरात असल्याने, ही कंपनी ईडीईएल या आपल्या डिलिव्हरी ब्रँडच्या अधिपत्याखाली वेगवेगळ्या ओईएम कंपन्यांकडून विविध प्रकारची व वेगवेगळ्या श्रेणीतील विद्युत वाहने खरेदी करेल. ‘ईडीईएल’कडे आधीपासूनच विद्युत वाहनांचा मोठा ताफा आहे आणि आता ‘फ्लिपकार्ट’च्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी हा ताफा येत्या काही महिन्यांत लक्षणीय प्रमाणात वाढवण्याचे या ब्रॅंडचे उद्दिष्ट आहे. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता व हैदराबाद या शहरांमध्ये ‘ईडीईएल’चे सध्या ठळक अस्तित्व असून येत्या वर्षअखेरीपर्यंत देशातील 20 अव्वल शहरांमध्ये हे अस्तित्व वाढविण्याचे या ब्रॅंडचे नियोजन आहे. त्यामुळे देशभरात पुरवठा साखळीमध्ये स्थित्यंतर घडविण्याची ‘फ्लिपकार्ट’ची योजना अखंडपणे आणि टप्प्याटप्प्याने पुढे नेण्यात मदत होईल.

फ्लिपकार्ट समुहाचे सप्लाय चेन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री म्हणाले, “लॉजिस्टिक ताफ्याचे विद्युतीकरण हा ‘फ्लिपकार्ट’च्या शाश्वत कामकाजाच्या मोठ्या उद्दिष्टाचा व प्रमुख लक्ष्यित धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. लॉजिस्टिक भागीदार म्हणून महिंद्रा लॉजिस्टिक्सशी संबंध निर्माण झाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. 2030 पर्यंत आमचा लॉजिस्टिकचा ताफा संपूर्णपणे विद्युत वाहनांचा असेल, या आमच्या नियोजनात ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’चा मोठा हातभार असणार आहे. आमच्या सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून, देशभरात विद्युत वाहनांचा स्वीकार आणि आमच्या ‘लॉजिस्टिक्स’च्या ताफ्यात विद्युत वाहनांचा 100 टक्के समावेश हे आमचे ध्येय आहे.”

‘एमएलएल’च्या या टप्प्यावर भाष्य करतांना या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, “महिंद्रा लॉजिस्टिक्स आपल्या राईज तत्वज्ञानाच्या अनुषंगाने शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यात कटिबद्ध आहे. विद्युत वाहनांच्या मार्फत अखेरच्या टप्प्यांपर्यंत होणारी ‘ईडीईएल’ची वितरण सेवा ही या अनुषंगानेच सुरू आहे. ग्राहकांना शाश्वत, कमी खर्चिक व तंत्रज्ञानाने सक्षम असे अखेरच्या टप्प्यापर्यंतच्या वितरणाचे सोल्यूशन ती पुरविते. मोठ्या एंटरप्राइझ ग्राहकांशी मोठ्या प्रमाणात भागीदारी करण्यावर व त्या अनुषंगाने आपले नेटवर्क विस्तृत करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. ‘फ्लिपकार्ट’बरोबरच्या या भागीदारीबद्दल आम्हाला आनंद आहे आणि ही भागीदारी यापुढेही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.”

देशभरातील आपल्या ‘लॉजिस्टिक्स’च्या ताफ्यात विद्युत वाहनांची भर घालण्याच्या दृष्टीने, ‘फ्लिपकार्ट’ने हिरो इलेक्ट्रिक, महिंद्रा इलेक्ट्रिक आणि पियाजिओ यांसह काही अग्रणी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांशी नुकतीच भागीदारीची घोषणा केली आहे. ई-कॉमर्स उद्योगासाठी सुयोग्य अशी कस्टमाईज्ड वाहने तयार करण्यासाठी, शाश्वततेच्या धोरणाला अनुसरून आपल्या परिसंस्थेतील अनेक भागीदारांबरोबर विद्युत वाहनांचे डिझाईन, त्यांची श्रेणी, भार क्षमता अशा अनेक बाबींवर ही कंपनी काम करीत आहे.

ईडीईएल ही ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’ची विद्युत वाहनांद्वारे अखेरच्या टप्प्यापर्यंत वितरण करणारी कार्गो सेवा आहे. ‘ईडीईएल’तर्फे अनेक पॅकेजेस आणि ट्रिप-आधारित सेवा देण्यात येतात. या ऑफर्समधून ग्राहकांना स्केलेबल, शाश्वत आणि कमी खर्चिक सोल्यूशन्स मिळतात. भार क्षमता व वर्धित श्रेणींच्या दृष्टीने आयसीईच्या विद्यमान पर्यायांशी तुलना केल्यास, ‘ईडीईएल’तर्फे ई-कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू, औषध कंपन्या, घरगुती उपकरणे व इलेक्ट्रॉनिक्स या उद्योगांना अत्यंत कार्यक्षम, जबाबदार वितरणाची आणि अखेरच्या टप्प्यापर्यंतच्या वितरणाची सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात येते

flipkart
flipkart 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *