टाटा स्टीलला रु. ९७५६/- कोटी नफा I प्रती शेअर रु. ५१/- चा लाभांश I Tata Steel Profit of Rs. 9756/- Crore I Rs. 51/- Dividend Declared I
टाटा स्टीलला रु. ९७५६/- कोटी नफा
प्रती शेअर रु. ५१/- चा लाभांश
टाटा स्टीलला चौथ्या तिमाहीत नफ्यात ४७% ची वाढ
टाटा स्टील ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला रु. ९७५६.२०/- कोटी चा निव्वळ नफा झाला असून त्यात ४६.८३% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ६६४४.१५/- कोटी चा नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ३८.६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६९,३२३.५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५०,०२८.३७/- कोटी होती. प्रती शेअर रु. ५१/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. २०२२ आर्थिक वर्षाकरिता कंपनीने रु. ४०,१५३.९३/- कोटी चा निव्वळ नफा कमविला आहे. त्यात ४३६% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo