टाटा कॅपिटलचे ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’

टाटा कॅपिटलचे ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’

टाटा कॅपिटल आपल्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये प्रस्तुत करत आहे ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’

• टाटा कॅपिटलच्या नवीन ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ ची आकर्षक वैशिष्ट्ये ग्राहकांना मिळवून देणार स्वातंत्र्य आणि सुविधा
• टाटा कॅपिटलच्या सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड अशा दोन्ही उत्पादन श्रेणींमध्ये उपलब्ध
• ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ च्या प्रसिद्धीसाठी विशेष एकात्मिक मार्केटिंग कॅम्पेन ‘इंडिया – अपने मन की करो’

मुंबई, ६ जानेवारी २०२२: टाटा कॅपिटल या टाटा ग्रुपमधील प्रमुख आर्थिक सेवा कंपनीने ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ ही नवीन श्रेणी सादर केली असून सर्व उत्पादन विभागांमध्ये त्यांचा लाभ घेता येणार आहे. टाटा कॅपिटलच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजांना अनुसरून स्वातंत्र्य व सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने कर्जांचा हा नवा विभाग सुरु करण्यात आला आहे.

टाटा कॅपिटलच्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ चा लाभ घेता येईल – १) व्यक्तिगत कर्ज २) व्यवसाय कर्ज ३) संपत्तीवरील कर्ज ४) दुचाकीसाठी कर्ज ५) वापरलेल्या कारच्या खरेदीसाठी कर्ज ६) गृह कर्ज. अनेक नवीन वैशिष्ट्यांसह प्रत्येक उत्पादनामध्ये अधिक जास्त लवचिकता आणण्यात आलेली असल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजांप्रमाणे कर्ज सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ ची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –
१. कर्ज परतफेडीचा कालावधी अधिक जास्त
२. ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि
३. सेट अप प्लॅन
*प्रत्येक उत्पादनाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत.

‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ च्या शुभारंभ प्रसंगी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे एमडी श्री. सरोश अमरिया यांनी सांगितले, “टाटा कॅपिटलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होण्याजोगी, किफायतशीर व सुविधाजनक आर्थिक उत्पादने सादर करून ग्राहकांना अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ या आमच्या नव्या सुविधेमध्ये अधिक जास्त लवचिक लाभांचा समावेश करण्यात आला आहे, ग्राहकांना आपल्या आर्थिक गरजांनुसार कर्ज सुविधांचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करवून देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. आमच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर आमच्या उत्पादनांचा लाभ अगदी पटकन आणि सहजपणे घेता येऊ शकतो. ‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ च्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना अधिक जास्त सेवासुविधा आणि मूल्य प्रदान करण्याचे आमचे उद्धिष्ट आहे.”

‘फ्लेक्सी प्लस लोन्स’ ची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या सुविधांचे लाभ घेता यावेत यासाठी एक विशेष एकात्मिक मार्केटिंग कॅम्पेन – ‘इंडिया – अपने मन की करो’ सुरु करण्यात येणार आहे. या कॅम्पेनमध्ये ३ विनोदी शॉर्ट फिल्म्स आहेत ज्यामध्ये नवीन उत्पादनांची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात आली आहेत.

Tata Capital flexi plus loans
Tata Capital flexi plus loans

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *