टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला तिसऱ्या तिमाहीत रु. ९७६९/- करोड नफा I TCS profit of Rs. 9769/- Crore I
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला तिसऱ्या तिमाहीत रु. ९७६९/- करोड नफा
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस हि भारतातील मोठी IT कंपनी असून डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १२.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९७६९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ८७०१/- करोड चा निव्वळ नफा झाला होता.
ऑपरेटिंग महसुलात १६.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४८,८८५/- करोड आहे. प्रति शेअर रु.७/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे.
प्रति शेअर रु.४५००/- ची शेअर बाय बॅक ऑफर कंपनीने दिली आहे. रु.१८,०००/- करोड चे शेअर कंपनी पुनर्खरेदी करणार आहे.
२०२१ मध्ये कंपनीने $२५ बिलियन चा सर्वाधिक महसूल प्राप्त केला आहे.
या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन २५% असून त्यात १.६% ची घट झाली आहे. $१०० मिलियन विभागात १० नवे क्लायंट कंपनीने जोडले आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo