जिमी मिस्त्री आंत्रप्रेन्युर्स, व्यावसायिक व तरुण नेत्यांचा जागतिक समुदाय तयार करण्यासाठी लाँच करत आहेत जगातील पहिला बिझनेस प्लॅटफॉर्म ‘डेल्‍ला लीडर्स क्‍लब (डीएलसी)’

व्यावसायिक व तरुण नेत्यांचा जागतिक समुदाय तयार करण्यासाठी लाँच करत आहेत जगातील पहिला बिझनेस प्लॅटफॉर्म ‘डेल्ला लीडर्स क्लब

  • २००० हून अधिक ग्लोबल ऑनररी कमिटी सदस्यांची आधीच नोंदणी झालेला हा प्लॅटफॉर्म पहिल्या टप्प्यात १५ शहरांमध्ये २६ नॉलेज डोमेन्स लाँच करण्यास सज्ज 
  • सदस्यांमध्ये समाजाचे ऋण फेडण्याचे तसेच समाजासाठी योगदान देण्याचे उद्दिष्ट असलेल्या आंत्रप्रेन्युर्स, व्यावसायिक आणि तरुण नेत्यांचा समावेश
  • डीएलसी ज्ञानाचे आदानप्रदान, जीवनशैली मार्गदर्शन आणि सामाजिक जबाबदारी यावर भर देत जगभरातील नेत्यांसाठी एक सहाय्यकारी परिसंस्था निर्माण करणार

इनोव्हेटर, डिझाइन थिंकर आणि सोशल आंत्रप्रेन्युर श्री. जिमी मिस्त्री यांनी डेल्‍ला लीडर्स क्लब (Della Leaders Club) या जगातील पहिल्या तंत्रज्ञानाधारित जागतिक व्यावसायिक प्लॅटफॉर्मच्या लाँचिंगची घोषणा केली आहे.

या प्लॅटफॉर्मचे शनिवारी, जून १२, २०२१ रोजी लोणावळा येथे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी भारत सरकारमधील रस्ते परिवहन व महामार्ग तसेच सूक्ष्म, छोटे व मध्यम उद्योग खात्यांचे माननीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन व पर्यावरण खात्यांचे माननीय मंत्री श्री. आदित्य ठाकरे व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित होते

श्री. नितीन गडकरी या कार्यक्रमात म्हणाले, “ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. कोविड साथीनंतरच्या जगातील नेत्यांना सहाय्य करण्याच्या उद्देशाने डेल्ला लीडर्स क्लब हा जगातील पहिला बिझनेस प्लॅटफॉर्म सुरू करणारे माझे मित्र जिमी मिस्त्री यांचे मी अभिनंदन करतो. डीएलसी प्लॅटफॉर्म नक्कीच जगातील तरुण नेतृत्वाला व उद्योजकतेला नवीन दृष्टी मिळवून देईल.”

श्री. आदित्य ठाकरे यांनीही या नवीन प्लॅटफॉर्मचे कौतुक केले आणि ते म्हणाले, “डेल्ला लीडर्स क्लब स्थापन केल्याबद्दल मी जिमी मिस्त्री यांचे हार्दिक अभिनंदन करतो. तुमच्या सर्जनशीलतेला सलाम! हा जगातील पहिला बिझनेस प्लॅटफॉर्म कंपन्यांना एकमेकींशी जोडेल आणि जगातील सर्वोत्तम बाबी आपल्या देशात आणेल. शिवाय याचा सामाजिक प्रभाव तर असेलच. आज कोविडचा सर्वाधिक परिणाम कशावर झाला असेल तर तो रोजगारनिर्मितीवर झाला आहे आणि पर्यायाने कुटुंबांनी तग धरून राहणे व आयुष्य पुढे चालू राहणे यावरही हा परिणाम झाला आहे. मी डीएलसीला शुभेच्छा देतो.” 

पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणून जिमी यांना मनापासून वाटते की, विशेषत: कोविड साथीनंतरच्या जगात आधुनिक नेत्यांना, जागतिक नेत्यांकडून झालेल्या ज्ञान व अनुभवाच्या आदानप्रदानाचा खूप फायदा होईल. डीएलसीद्वारे जागतिक नेत्यांचा एक अनन्यसाधारण व संरक्षित समुदाय तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. हे नेते यशस्वी आयुष्यापासून लक्षणीय आयुष्याकडे उत्क्रांत होण्यात परस्परांना सहाय्य करतील. 

“गेल्या २५ वर्षांत जगातील सर्वाधिक यशस्वी उद्योजक, कॉर्पोरेट व्यावसायिक, सेलेब्रिटीज आणि सोशलाइट्सपैकी काहींसाठी डिझायनिंगचे काम केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, ते शिकण्यासाठी व प्रचलित जगाच्या पुढे राहण्यासाठी उत्सुक आहेत. आपण चढउतारांनी भरलेल्या जगात राहतो आणि सर्व उद्योगक्षेत्रांतील लोकांना सक्षम करणारी अशी एक सहाय्यकारी व्यवस्था हवी असते हे मला कळून चुकले. हा प्लॅटफॉर्म नेटवर्किंगच्या पलीकडे जाणारा आहे. तो समुदायापर्यंत पोहोचण्यासोबतच ज्ञानाच्या विकासावर भर देणारा आहे,” असे डेल्ला लीडर्स क्लबचे संस्थापक आणि अध्यश्र श्री. मिस्त्री म्हणाले

Della Leaders Club
Della Leaders Club

डेल्‍ला लीडर्स क्‍लब बाबत
डेल्‍ला लीडर्स क्‍लबचे जागतिक स्‍तरावर न्‍यूयॉर्क, लंडन, दुबई, हाँगकाँग, सिंगापूर, बँकॉक, मुंबई, दिल्‍ली, बेंगळुरू, हैद्राबाद, चेन्‍नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, इंदौर या १५ शहरांमध्‍ये २,००० हून अधिक जागतिक मानद समिती सदस्‍य आहेत.

व्‍यवसाय प्रमुखांना अग्रस्‍थानी ठेवण्‍यासाठी १३ व्‍यवसाय समिती व १३ जीवनशैली समितींचा समावेश असलेल्‍या २६ समितींना आधुनिक ट्रेण्‍ड्ससंबंधित उपयोजन करण्‍यास सुलभ अशी व्‍यावसायिक माहिती देण्‍याचा या तंत्रज्ञान व्‍यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे. डीएलसी संकल्‍पना अगोदरच व्‍हायरल झाली आहे, म्‍हणूनच आम्‍ही आयव्‍हीवाय लीग्‍समधील प्रतिष्ठित संस्‍था व त्‍यांच्‍या माजी संस्‍थांमधील पुरूष व महिलांना ९ युनिकॉर्न स्‍टार्ट-अप संस्‍थापक, ईओ, वायपीओ सदस्‍य, फोर्ब्‍स लिस्‍टर्स, एनवायसी बेस्‍ट सेलर्स, ग्रॅमी अवॉर्ड विनर्स, टॉप गव्‍हर्नमेंट अटॉर्नीज आणि यूएन सहयोगी म्‍हणून नियुक्‍त करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलो आहोत. संस्‍था विविधता व समानतेच्‍या तत्त्वासह कार्यरत आहे, ज्‍यामध्‍ये उद्योजकतेच्‍या उत्‍साहामधून एकत्र आलेले राष्‍ट्रीयत्‍व, निष्‍ठा, लिंग, काळ व क्षेत्रांचा समावेश आहे.

सौ रचना बागवे I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I Rachna Bagwe

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *