‘कोविड-19’पासून भारताला संरक्षित करणाऱ्या योगदानाबद्दल ‘गोदरेज अप्लायन्सेस’चा गौरव
‘कोविड-19’पासून भारताला संरक्षित करणाऱ्या योगदानाबद्दल ‘गोदरेज अप्लायन्सेस’चा गौरव
‘आयएचडब्ल्यू’च्या वतीने ‘इंडिया हेल्थ अॅंड वेलनेस अॅवॉर्ड 2020’ देऊन ब्रॅंडचा सन्मान; आरोग्य व स्वास्थ या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याची दखल
मुंबई : ‘कोविड-19’वरील लसींची साठवणूक व तिचे वितरण करण्याकरीता सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये शीतगृहांची साखळी उभी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल, ‘गोदरेज अप्लायन्सेस’ या कंपनीला ‘इंटिग्रेटेड हेल्थ अॅंड वेलनेस कौन्सिल’च्या (आयएचडब्ल्यू) वतीने ‘कोविड संरक्षण प्रकल्प’ या श्रेणीतील ‘इंडिया हेल्थ अॅंड वेलनेस अॅवॉर्ड 2020’ देण्यात आले आहे. ही माहिती गोदरेज समुहातील दिग्गज, ‘गोदरेज अॅंड बॉइस’ या कंपनीतर्फे आज देण्यात आली. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ हा ‘गोदरेज अॅंड बॉइस’चाच एक व्यवसाय असून तो शीतगृह उत्पादनाच्या क्षेत्रात भारतात अग्रगण्य आहे. कोविड लसीकरणाच्या सर्वात मोठ्या मोहिमेची तयारी देशभरात सुरू असताना, लसींसाठीच्या शीतगृहांच्या साखळीतील एंड-टू-एंड सोल्युशन पुरविण्याकरीता गोदरेज अप्लायन्सेस हा ब्रॅंड सज्ज झाला आहे.
केंद्रिय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसींसाठीचे अत्याधुनिक रेफ्रिजरेटर व डीप फ्रीझर यांचा 11,856 इतक्या संख्येने पुरवठा करण्याची निविदा ‘गोदरेज अप्लायन्सेस’ने नुकतीच जिंकली आहे. ही प्रगत वैद्यकीय उपकरणे देशभरातील विविध राज्यांमधील डेपोंमध्ये असंख्य शासकीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये पाठविली जात आहेत आणि त्यातून ‘कोविड-19’लसीकरण कार्यक्रमासाठीची शीतगृहांची साखळी बळकट करण्यात येत आहे.
‘इंडिया हेल्थ अॅंड वेलनेस अॅवॉर्ड 2020’ हा ‘इंटिग्रेटेड हेल्थ अॅंड वेलनेस कौन्सिल’चा (आयएचडब्ल्यू) एक प्रमुख उपक्रम आहे. या कौन्सिलमध्ये प्रमुख सरकारी अधिकारी, आरोग्यसेवा उद्योग, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य व स्वास्थ्य संस्था, सामाजिक संघटना, समुदायांमधील नेते, संशोधक, तंत्रज्ञानाचाचे पुरवठादार आणि प्रभावशाली व्यक्ती असे आरोग्य व स्वास्थ्य यांसाठी समर्पितपणे काम करणारे सर्व घटक एकत्र आलेले आहेत. ‘आयएचडब्ल्यू’ दरवर्षी देशरातून अर्ज मागविते व मानवजातीच्या आरोग्य व स्वास्थ्यासाठी उल्लेखनीय व अर्थपूर्ण योगदानास मान्यता देते.
या पारितोषिकाच्या परीक्षक मंडळात माजी केंद्रीय आरोग्य सचिव जेव्हीआर प्रसाद, ‘एनएबीएच’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अतुल मोहन कोचर, ‘सीएएचओ’चे अध्यक्ष डॉ. विजय आगरवाल, ‘आयसीएमआर कन्सोर्टियम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी मेहरोत्रा, ‘आर्टिस्ट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमा दिवाकर, भोपाळ येथील ‘एम्स’चे प्रमुख डॉ. वाय. के. गुप्ता यांचा समावेश होता. पारितोषिक वितरण समारंभास आरोग्यसेवा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

देशाची सेवा करण्यासाठी ‘गोदरेज अॅंड बॉइस’ कंपनी नेहमीच कटिबद्ध असते. ‘मेडिकल कॉम्पोनंट्स’, ‘हॉस्पिटल बेड अॅक्च्युएटर्स’, ‘व्हेंटिलेटर्स’साठीचे ‘इलेक्ट्रो-मॅग्नेटिक व्हॉल्व्ह’ यांसारखी उपकरणे असोत; लोकांना घरात सुरक्षितपणे राहता यावे यासाठी ‘डिसइन्फेक्टंट’ उपकरणे बनविणे असो; किंवा लोकांना सुरक्षितपणे काम करता येण्यासाठी सामाजिक अंतर राखता येण्याजोगी कार्यालये उभी करणे असो; ‘गोदरेज’ने नेहमीच देशाचा विचार प्राधान्याने केला आहे. ‘मेड इन इंडिया’ मेडिकल रेफ्रिजरेटर्स व फ्रीझर्स बनवून, देशाला सर्वात जास्त गरज असलेल्या वेळी, कोविड साथीच्या काळात सेवा करता येत असल्याचा कंपनीला अभिमान आहे.
हे पारितोषिक स्वीकारताना ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट व नवीन व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख जयशंकर नटराजन म्हणाले, “गेल्या काही वर्षांत ‘गोदरेज अप्लायसेस’ने रेफ्रिजरेशनमध्ये कौशल्य मिळवले आहे आणि ‘वैद्यकीय रेफ्रिजरेशन डोमेन’मध्ये अधिक वाढ केली आहे. देशाला लसीकरणासाठी शीतगृहांच्या मजबूत साखळीची गरज भासली, अशावेळी या कार्यात आपले योगदान देण्यास सक्षम असल्याचा, आणि आपले कौशल्य आज उपयुक्त ठरत असल्याचा आम्हाला आनंद आहे. आमचे कौतुक केल्याबद्दल आम्ही ‘इंटिग्रेटेड हेल्थ अॅंड वेलनेस कौन्सिल’च्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. या प्रकल्पातून आणि त्याही पलीकडे, सरकार व आरोग्य कर्मचारी यांच्यासमवेत, ‘कोविड-19’च्या लसींच्या वितरणात, अखेरच्या टप्प्यापर्यंत लस पोहोचविण्यात सहभागी होऊन, लाखो जणांचे रक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! संपर्क – 8082349822