कोरोनामुळे ८ कोटी लोकांनी गमावली नोकरी I
कोरोनामुळे ८ कोटी लोकांनी गमावली नोकरी I
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार कोरोनामुळे आशिया प्रशांत परिक्षेत्रात ८ कोटी कामगारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यात सर्वाधिक तरुण आणि महिला कमर्चाऱ्यांचा समावेश आहे.
कामगारांचे उत्पन्न देखील सरासरी १० टक्क्यांनी घसरले असल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या तिमाहीत १९.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२०१९ मध्ये स्थानिक पातळीवर बेरोजगारीचा दर ४.४ टक्के होता. तो २०२० मध्ये ५.२ टक्के ते ५.७ टक्के इतका वाढेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या महासंचालक चिहोको असादा मियाकावा यांनी सांगितले.