एल आय सी ने शेअर मार्केट मध्ये गुंतवले ५५,००० करोड रुपये
एल आय सी ने शेअर मार्केट मध्ये गुंतवले ५५,००० करोड रुपये
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये एल आय सी ने ५५,००० करोड रुपये शेअर बाजारात गुंतवले असल्याची माहिती एल आय सीच्या अध्यक्षांनी दिली आहे. तसेच एल आय सी ने १८,५०० करोड रुपयांचा नफा शेअर बाजारातून कामविल्याचेही त्यांनी नमूद केले. मागील आर्थिक वर्षात ३२,८०० करोड रुपये शेअर बाजारात गुंतवले होते.
तरुणांमध्ये इन्शुरन्सचे महत्व वाढते आहे, हि खूप चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांसाठी एल आय सी कडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एकूण विक्रीपैकी जवळपास ५० टक्के इन्शुरन्स हे तरुणांनी विकत घेतले आहेत.