एल अँन्ड टी टेक सर्व्हिसेसला रु. २६२/- कोटी नफा I L & T Tech services profit of Rs. 262/- Crore I
एल अँन्ड टी टेक सर्व्हिसेसला रु. २६२/- कोटी नफा
एल अँन्ड टी टेक सर्व्हिसेसला निव्वळ नफ्यात ३५% ची वाढ
एल अँन्ड टी टेक्नॉलॉजी सर्विसेस ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३४.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २६२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९४.५/- कोटी होती. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक , अमित चड्ढा म्हणाले, २०२२ आर्थिक वर्षात कंपनीने अनेक ध्येय गाठली असून विदेशातून महसुलात २०% ची वाढ झाली आहे. ऑपरेटिंग मार्जिन मध्ये देखील वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. एकूण ऑपरेटिंग महसुलात २२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७५६.१/- कोटी आहे. मार्च २०२१ अखेर तिमाहीत हि रक्कम रु. १४४०.५/- कोटी होती. इलेक्ट्रिक ऑटोनॉमस कानेक्टेड विभागात कंपनीला $१०० मिलियन हुन अधिक च्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला एकूण नफ्यात ४४.२७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९५७/- कोटी आहे. एकूण ऑपरेटिंग महसुलात २०.५५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६५६९.७/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo