एच डी एफ सी बँकेला रु.१०,३४२/- करोडचा निव्वळ नफा I HDFC Bank profit of Rs. 10,342/- Crore I
एच डी एफ सी बँकेला रु.१०,३४२/- करोडचा निव्वळ नफा
एच डी एफ सी बँकेला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १८% ची वाढ
एच डी एफ सी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर- डिसेंबर दरम्यान तिमाहीत बँकेला रु.१०,३४२/- करोड चा निव्वळ नफा झाला असून त्यात १८% ची वाढ झाली आहे. महसुलात मोठी वाढ झाल्याने हा फायदा झाला आहे. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पनात १३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १८,४४३.५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६,३१७.६/- करोड होती.इतर उत्पन्न रु. ८१८३.६/- करोड असून त्यात मागील वर्षीचे तुलनेत १०% ची वाढ झाली आहे. ऑक्टोबर- डिसेंबर कालावधीत फी कमिशन मधून उत्पन्न रु. ५०७५.१/- करोड आहे. फॉरेन एक्सचेंज अँन्ड डेरिव्हटिव्ह मधून महसूल रु. ९४९.५/- करोड आहे. एकूण कर्ज वितरण १६.५% ने वाढले असून हि रक्कम रु. १२,६०,८६३/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo