इंडियन बँकेला निव्वळ नफ्यात घट I Indian Bank profit reduced I
इंडियन बँकेला निव्वळ नफ्यात घट
सरकारी मालकीच्या इंडियन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत बँकेला निव्वळ नफ्यात ४२.४% ची घट झाली असून हि रक्कम रु. ९८४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७०९/- कोटी होती. डिफर टॅक्स असेट व इतर तरतुदीत वाढ झाल्याचे बँकेने सांगितले. रु.१६१/- कोटींचे राईट बॅक बँकेला मिळाले आहेत. एकूण तरतूद वाढली असून २०.४% आहे. हि रक्कम रु. १९१४/- कोटी आहे. ऑपरेटिंग नफ्यात १५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७३८/- कोटी आहे. एकूण उत्पन्न ९% ने वाढले असून हि रक्कम रु. ११,४०५/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo