अर्थसंकल्प २०२२ – सर्वसामान्यांची निराशा I Budget 2022 Nothing for Common Man I
अर्थसंकल्प २०२२ – सर्वसामान्यांची निराशा
- भारताचा विकास दर ९.२७ टक्के असण्याचा अंदाज
- अर्थसंकल्पातून भारताला पुढील २५ वर्षांचा पाया मिळणार
- सरकार भांडवली खर्च १०.६८ लाख कोटी करणार
- भांडवली गुंतवणुकीत ३५.४० टक्के वाढ. ७.५० लाख कोटी रुपये गुंतवले जाणार
- राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
- रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल चलन, ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून डिजिटल रुपया आणणार
- पुढील पाच वर्षांत ६० लाख नव्या रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य
- पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवणार. २० हजार कोटी रुपयांची तरतूद.
- रेल्वे, जल, हवाई वेगवान वाहतुकीसाठी गुंतवणूक करणार. १०० नवे कार्गो जाळे बनवणार.
- देशात २५ हजार किमीचं रस्त्याचं जाळं उभं करणार
- पुढच्या तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु होणार
- पिकांच्या देखरेखीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्यास परवानगी
- कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पांना नाबार्डच्या माध्यमातून मदत करणार
- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी पुढील पाच वर्षांसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद
- पेयजलासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद
- गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवणार
- शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल, स्थानिक भाषेत शिक्षण
- डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार
- पीएम ई- विद्या चॅनल सुरू करणार, शिक्षणासाठी उच्च दर्जाचा ई-कंटेन्ट उपलब्ध करून देणार
- २ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार
- पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ८० लाख घरे बांधणार, ४८,००० कोटींचा निधी देणार
- ४.५ लाख टपाल कार्यालये डिजिटल पेमेंट अंतर्गत येणार
- पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होईल
- ७५ डिजिटल बँकिंग केंद्रे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ डिजिटल जिल्ह्यांत
- चीप असणारे ई-पासपोर्ट योजनेला चालना देणार
- जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन
- २१ मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरु करणार
- २०२२-२३ मध्ये ५ जी मोबाइल सेवा सुरू होणार
- सर्व गावांमध्ये भारत नेटद्वारे ऑप्टिकल फायबरसाठी कंत्राट देणार. २०२५ मध्ये प्रत्येक गावात इंटरनेट असणार
- देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी काम करण्यात येणार असून ११२ जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार
- संरक्षण क्षेत्रातील २५ टक्के संशोधन आणि विकासाचा निधी खासगी कंपन्यांना संशोधनासाठी उपलब्ध करून देणार
- संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी स्वदेशी उद्योगांकरिता संरक्षण खर्चापैकी ६८ टक्के तरतूद
- सर्व मंत्रालयांमध्ये खरेदी व्यवहारांसाठी ई-बिल यंत्रणा सुरू करणार
- देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार
- नगर नियोजन क्षेत्रातील पाच शिक्षणसंस्थांच्या आधुनिकीकरणासाठी २५० कोटींचा निधी
- प्राप्तिकर परतावा विवरणपत्र भरताना काही चुका झाल्यास दुरुस्त करण्याची संधी मिळणार
- सहकार क्षेत्राचा कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यावंर
- को-ऑपरेटिव्ह सोसीयटी ज्यांचं उत्पन्न १ ते १० कोटी आहे त्यांचा कर १२ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत कमी
- कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर
- कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ वरून ७ टक्क्यांवर
- सौरऊर्जा निर्मितीसाठी १९ हजार ५०० कोटींची तरतूद
- क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार
- स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत करसवलत दिली जाईल
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo