हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन करून डॉ अमित बागवे यांनी केला विश्वविक्रम
हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन – महाराष्ट्राच्या उद्योग जगताला नवी भरारी
हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन करून डॉ अमित बागवे यांनी केला विश्वविक्रम
मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी उद्योजकतेसाठी डॉ अमित बागवे कटिबद्ध आहेत व त्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील असतात. या पुस्तक प्रकाशनामुळे ‘मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी उद्योजकता’, जगाच्या व्यासपीठावर आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचे योगदान सर्वात मोठे आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाला उतरती कळा लागली होती, परंतु दिवाळी नंतर पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय नव्या जोमाने सुरु होत आहेत.
महाराष्ट्रातील उद्योजकांचे मनोबल वाढावे व नवीन उद्योजकांना सुद्धा स्फूर्ती मिळावी या उद्देशाने अर्थसंकेत तर्फे डॉ अमित बागवे लिखित ‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा!’ या पुस्तकाचे प्रकाशन हेलिकॉप्टर मधून भरारी घेऊन करण्यात आले.
विको या जगप्रसिद्ध ब्रँडचे संचालक श्री संजीव पेंढारकर यांच्या हस्ते अधांतरी हवेमध्ये हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तक प्रकाशनाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ तसेच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये सुद्धा करण्याचे ठरले आहे.
‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा!’* या पुस्तकामध्ये ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ब्रँड्सची यशोगाथा मांडण्यात आली आहे. ज्याद्वारे सर्व उद्योग जगताला मार्गदर्शन मिळणार आहे.
हेलिकॉप्टर मधून भरारी घेऊन महाराष्ट्राच्या उद्योग जगातला एक नवी भरारी देण्याचा मानस या पुस्तक प्रकाशनामागे आहे.
डॉ अमित बागवे यांचा ४० वा वाढदिवस विश्वविक्रम करून साजरा करण्यात आला.
श्री जोशुआ बोर्डे, कॅप्टन निलेश गायकवाड, डॉ अविनाश फडके, सौ रचना बागवे, श्री संतोष सावंत व डॉ भुषण लचके यांचे विशेष सहकार्य लाभले.
पुस्तक खरेदीसाठी आपले नावं आणि पत्ता व्हाटसऍप करा – ८०८२३४९८२२