सेमीकंडक्टर क्षेत्राकरिता कॅबिनेट कडून रु.७६,०००/- करोडच्या इन्सेन्टिव्ह स्कीम मंजूर I Semiconductor Government Scheme I
सेमीकंडक्टर क्षेत्राकरिता कॅबिनेट कडून रु.७६,०००/- करोडच्या इन्सेन्टिव्ह स्कीम मंजूर
सेमीकंडक्टर क्षेत्राकरिता कॅबिनेट कडून रु.७६,०००/- करोड च्या इन्सेन्टिव्ह स्कीम करिता मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत भारत २० हुन अधिक सेमीकंडक्टर डिझाईन, कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग , डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट्स चे सेट अप पुढील ६ वर्षांत करू शकेल.
भारताला इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे हब म्हणून प्रसिद्ध करण्याकरिता मोदी शासनाने हि मंजुरी दिली आहे. सरकारने या संदर्भात कंपन्यांकडून अभिप्राय मागितल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर ही मंजुरी मिळाली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय (MeitY) आता तपशीलवार माहिती देईल आणि अर्ज आमंत्रित करेल.नवीन सेमीकंडक्टर धोरणामुळे भारतातील उत्पादन क्षेत्र अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने मंजुरीपूर्वी सांगितले. या योजनेला “सेमिकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी कार्यक्रम” असे नाव देण्यात आले आहे.
योजनेचा एक भाग म्हणून, मोठ्या कंपन्यांव्यतिरिक्त, सरकार स्टार्टअप्सना सेमीकंडक्टर डिझाइन सहित बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल. एकूण १.७/- लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, योजनेमध्ये ८५,००० सेमीकंडक्टर अभियंत्यांना संपूर्ण सी टू एस (चिप ते स्टार्टअप्स) इकोसिस्टम (डिझाईन, फॅब्रिकेशन, चाचणी आणि पॅकेजिंगसह) बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना आहे.त्यांनी नवीन डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) बद्दल देखील तपशीलवार माहिती दिली, ज्यातील ५०% खर्च सरकार उचलेल.
सरकारच्या आतापर्यंतच्या ध्येयानुसार, डिस्प्लेसाठी एक ते दोन फॅब युनिट्स आणि घटक डिझाइन आणि उत्पादनासाठी प्रत्येकी १० युनिट्सचा समावेश आहे.आतापर्यंत, इस्रायलचा टॉवर सेमीकंडक्टर, ऍपलची कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉन आणि सिंगापूरस्थित एक कंपनी, वेदांत ग्रुप यांनी सेमीकंडक्टर युनिट्स उभारण्यात स्वारस्य दाखवले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमामुळे ३५,००० /- उच्च दर्जाच्या नोकऱ्या आणि एक लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असे वैष्णव यांनी सांगितले.जागतिक उद्योग सध्या सेमीकंडक्टर चिप्सच्या तीव्र टंचाईने समस्येत आहेत. ज्यामुळे जगभरातील उत्पादन प्रक्रिया विस्कळीत झाली आहे आणि किंमती देखील वाढल्या आहेत.
सेमीकंडक्टर चिप्स या कार ते फोन अश्या विविध उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीत वापरले जातात. अलीकडच्या काळात, अनेक कारणांमुळे त्यांचा पुरवठा गंभीरपणे कमी झाला आहे, ज्यामुळे ऑटोमोबाईल्स आणि गॅझेट्स या उद्योगांवर संकट निर्माण झाले आहे.याशिवाय, टीव्ही, लॅपटॉप आणि अगदी वॉशिंग मशिन यांसारख्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंना सेमीकंडक्टरची आवश्यकता असते.
सॅमसंग आणि क्वालकॉम सारख्या जागतिक चिपमेकिंग कंपन्या , सिस्को सिस्टीम्स आणि शाओमी सारख्या गॅझेट निर्मात्यांना चिप्सची चाचणी, पॅकेज आणि विक्री करतात.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo