रशिया बरोबर व्यापाराकरिता भारत करणार रुपी ट्रेडिंगचा वापर I India Russia Trade in Rupee I
रशिया बरोबर व्यापाराकरिता भारत करणार रुपी ट्रेडिंगचा वापर
रशिया बरोबर व्यापाराकरिता रुपयातील चलनाचा वापर करण्याच्या विचारात भारत असून हा निर्णय त्वरित घेतला जाईल असे काही सूत्रांनी सांगितले. भारतीय निर्यातदारांचे $५०० मिलियन ची थकबाकी रशिया कडे असून हा व्यापार रुबेल व रुपी मध्ये सेटल केला जाईल. सेंट्रल बँक, यूको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा सल्ला घेतला जाईल. रशिया व युक्रेन मधील वादाचा परिणाम पुरवठा साखळी विस्कळीत होणे व कमोडिटी किमती वाढीवर झाला आहे. त्यामुळे भारतात महागाई दर वाढत आहे. रुबेलला भारतीय चलनात रूपांतरित करून भारतीय बँकेत डिपॉझिट केले जाईल. व्यापारात समतोल आणण्याकरिता प्रयत्न केले जातील. भारताकडे $५ बिलियन ची व्यापारी तूट असून हे प्रमाण कमी करण्याकरिता भारत प्रयत्न करीत आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo