मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचा आय पी ओ ७ एप्रिल २०२१ रोजी I Macrotech Developers IPO I
मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचा आय पी ओ ७ एप्रिल २०२१ रोजी I Macrotech Developers IPO I
मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचा आय पी ओ ७ एप्रिल २०२१ रोजी IPO
मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीचा आय पी ओ लवकरचं येणार आहे.
कंपनीची समभाग विक्री योजना बुधवार ७ एप्रिल २०२१ रोजी खुली होणार असून ९ एप्रिल २०२१ रोजी बंद होईल.
आय पी ओ’तून २५०० कोटींचा निधी उभारण्यात येणार आहे.
ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ४८३-४८६ रुपये निश्चित केला आहे.
कंपनी ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्स आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या (“मॅनेजर्स”) सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाविषयी विचार करू शकतात. फ्रेश इश्युमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी ३० कोटीपर्यंतच्या शेअर्सचे आरक्षण आहे आणि निव्वळ इश्यू खालीलप्रमाणे असेल.
क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स ५० टक्क्यांहून जास्त असणार नाही. नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स १५ टक्क्यांहून अधिक असणार नाहीत आणि किरकोळ स्वतंत्र बिडर्स ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाहीत.
कंपनीचे सध्या ५४ सुरु असलेले आणि नियोजित प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये एकूण सुमारे ७३.९ दशलक्ष विकास करण्याजोगे क्षेत्रफळ आहे.
परवडण्याजोग्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माणावर लक्ष केंद्रीत करून निवासी रिअल इस्टेट विकासाचा प्रमुख व्यवसाय हे त्यांचे बलस्थान आहे.
२०१९ साली मॅक्रोटेक डेव्हलपर्सनी लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रिअल पार्क्समध्ये पदार्पण केले आणि ईएसआर मुंबई ३ पीटीई लिमिटेड यांच्यासोबत जॉइंट व्हेंचर केले. ही कंपनी ईएसआर केमॅन लिमिटेडची उपकंपनी असून तो एक आशिया पॅसिफिकवर केंद्रीत लॉजिस्टिक्स रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म आहे
फ्रेश इश्यूमधून संकलित होणारी रक्कम कंपनीच्या १५०० कोटीपर्यंतच्या एकूण थकित कर्जाची कपात करणे ३७५ कोटीपर्यंत जमीन संपादन किंवा जमीन विकास हक्क संपादित करणे आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येईल.
इश्यूसाठी एक्सिस कॅपिटल लिमिटेड, जे. पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. या इश्युसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एडलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शिअल्स लिमिटेड, येस सिक्युरिटीज लिमिटेड (इंडिया) लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R