नेटवर्क १८ मीडियाला रु.१९९/- करोडचा निव्वळ नफा I Network 18 Media profit of Rs. 199/- Crore I
नेटवर्क १८ मीडियाला रु.१९९/- करोडचा निव्वळ नफा
नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडने सप्टेंबर तिमाही अखेर एकत्रित निव्वळ नफ्यात तीन पटीने वाढ नोंदवली असून हि रक्कम रु. १९९.२७/- करोड आहे. एका वर्षापूर्वी जुलै-सप्टेंबर या कालावधीत कंपनीने रु.६८.०१/- करोड चा निव्वळ नफा कमावला होता .
ऑपरेशन्समधील महसूल ३०.७६% ने वाढून रु.१३८७.२४/- करोड आहे. मागील वर्षीच्या या कालावधीत हि रक्कम रु. १०६०.८९/- करोड होती. बातम्या आणि मनोरंजन दोन्ही व्यवसायांत कंपनीने नफा कमविला आहे. एकूण खर्च रु.११८९.०४/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९७६.९०/- करोड होती.
निकालांवर टिप्पणी करताना नेटवर्क १८ चे अध्यक्ष आदिल जैनुलभाई म्हणाले की, हि तिमाही खूपच उल्लेखनीय आहे,, हा मध्यम-मुदतीच्या दृष्टीने आणि ग्राहकांभिमुख असलेल्या सर्व व्यवसायांसाठी ही एक चांगली बातमी आहे.
बातम्या आणि मनोरंजन या दोन्ही व्यवसायांना महामारीच्या काळात वाढ मिळाली आणि आम्ही त्या नफ्यांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवू. क्रीडा प्रकारातील विस्तारामुळे, आम्ही आमच्या मनोरंजन पोर्टफोलिओला पुढील स्तरावर वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
नेटवर्क १८ मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट हे सर्वात मोठे मीडिया समूह आहे आणि स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे त्याचा प्रचार केला जातो व रिलायन्स इंडस्ट्रीज हे एकमेव लाभार्थी आहेत .
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R