कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द
कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द
रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्याचा अध्यादेश सोमवारी ७ डिसेंबर रोजी दिला.
बँकेतील आर्थिक अनियमितता आणि अपहार यामुळे रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्यात आली होती. बँकेचे काही संचालक आणि अधिकाऱ्यांवर ३१० कोटींचा अपहार केल्याचा आरोप काही सभासदांनी केला, याबाबत पोलीसांत गुन्हे दाखल झाले असून तसेच न्यायालयात देखील बँकेच्या गैरकारभाबाबत खटला सुरु आहे.
सहकार आयुक्तांनी ही बँक दिवाळखोरीत गेल्याचे जाहीर केले असून बँकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांपासून बँकेवर निर्बंध टाकण्यात आले होते. बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अंतर्गत पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळेल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. कराड जनता सहकारी बँकेच्या २९ शाखा असून ३२ हजारांवर सभासद आहेत.