उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न !
उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न !
मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांचे कार्यालय, मंत्रालयात अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न झाला.
डॉ अमित बागवे लिखित ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाटसऍप मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांनी माननीय उद्योगमंत्री व सर्व पुरस्कर्त्यांचे स्वागत केले व अर्थसंकेतकच्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्र गौरव कार्यक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली. उद्योजकांनी अडचणींवर मात करून यशाकडे वाटचाल सुरु ठेवली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांनी उपस्थित उद्योजकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उद्योजक हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असल्याचे मत त्यांनी मांडले व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. अर्थसंकेतच्या कार्याचा गौरव त्यांनी केला व अशाच प्रकारे कार्य करीत राहा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.
श्री निकेतन तावरे व निर्मला तावरे – निर्मलाज ब्राईटवेज एम बी ए क्लासेस, सौ मनीषा कोळी – सारंग हँडीक्राफ्ट, श्री वैभव घोबाळे – क्रांती उद्योजकता एकता केंद्र, श्री श्रीकांत लचके – मेड इन स्वदेशी चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, ऍडव्होकेट शिवांगी झरकर – कॉर्पोरेट अँड बिझनेस लॉयर,श्री अजिंक्य देव – देव मसाले, डॉ संदीप माळी – जनसेवा पतसंस्था, कै. मनोहर नाईक (जागतिक संमोहनतज्ञ) यांच्यावतीने श्री विकास नाईक, प्रा राकेश कांबळी, श्री प्रमोद वराडकर – महापुरुष बालदीप मंडळ, शरद मल्टीस्टेटचे श्री विनायक आ राठोड, श्री प्रदीप सांडगे, श्री सुभाष साळुंखे कोरोना योद्धा पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘अर्थसंकेत – महाराष्ट्र गौरव २०२१’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोलाची भर घातली आहे, अशा लोकांचा सन्मान अर्थात ‘अर्थसंकेत – महाराष्ट्र गौरव २०२१’. असे उद्योजक ज्यांनी शून्यातून एक उद्योग उभा केला. ज्यांनी आपल्या आयुष्याची जोखीम घेऊन उद्योग निर्माण केला, रोजगार निर्माण केले, समाजाचे देणे फेडले, तसेच एखाद्या क्षेत्रात मोठे यश मिळवून महाराष्ट्राचे नाव मोठे केलं आहे अशा महाराष्ट्रीय माणसांचा सन्मान या सोहळ्याद्वारे करण्यात आला.
ज्या उद्योजकांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे, त्यांना पुढच्या पायरीवर जाण्यासाठी, ज्या व्यासपीठाची आवश्यकता असते, ते व्यासपीठ अर्थसंकेतने निर्माण केले आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R