सौ रचना लचके बागवे यांची विश्वविक्रमाला गवसणी I World Record Rachna Lachke Bagwe I
सौ रचना लचके बागवे यांची विश्वविक्रमाला गवसणी
365Days@365Stories हा ध्यास घेऊन सौ रचना लचके बागवे यांनी विश्वक्रमालाविश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. सलग ३६५ दिवस रोज एक नवी मुलाखत या उपक्रमाची सुरुवात २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाली आणि २० एप्रिल २०२४ रोजी ३६५ दिवस पूर्ण झाले. ह्या मुलाखतीच्या शृंखले मध्ये उद्योजक, शासकीय अधिकारी, समाज सेवक आणि कलाकार असे विविध पार्शवभूमी असलेल्या लोकांचा जीवन प्रवास ‘Rachna Lachke Bagwe’ या त्यांच्या ‘YouTube Channel’ वर उलगडण्यात आला आहे. हा ३६५ दिवसांचा प्रवास काही सोपा न्हवता, अथक परिश्रम, सातत्य, नावीन्य आणि सयंमाने हे कार्य रचनाजी यांनी पूर्णत्वास नेले.
३६५ व्या दिवशी म्हणजेच २० एप्रिल २०२४ रोजी एक भव्य दिव्य कार्यक्रम ह्या ३६५ लोकांना आणि मित्र परिवाराला घेऊन श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन आणि रूपरेषा श्री. प्रदीप मांजरेकर यांनी केली. कार्यक्रमात ‘OMG Book Of Records’चे डॉ. दिनेश गुप्ता यांनी सौ रचना बागवे यांना सन्मान चिन्ह, मेडल आणि सर्टिफिकेट देऊन रेकॉर्ड होल्डर म्हणून जाहीर केले. ह्या कार्यक्रमात दोन चर्चासत्र ठेवण्यात आली होती, त्यात ATC Cargo चे श्री. शंतनू भडकमकर, टाटा स्टील चे उपाध्यक्ष श्री. योगेश जोशी, UK Resort चे श्री. संतोष पाटील, माधवबागचे डॉ. रोहित साने, वास्तू रविराजच्या डॉ.मंजुश्री अहिरराव, मी विजेता होणारचचे डॉ. उमेश कणकवलीकार आणि अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे सहभागी होते. तसेच रचना बागवे लिखित ‘सप्तरंग उद्योजकतेचे भाग २’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ संतोष कामेरकर. सौ शशिकला वाटवे, योजना घरत, डॉ सर्जेराव सावंत, डॉ शरयू सावंत, श्री बिपीन पोटे व श्री मनोज डुंबरे यांचा जीवन प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला आहे.
त्याच सोबत या कार्यक्रमात काही शासकीय अधिकारी आणि समाज सेवकांचा सत्कार करण्यात आला, ज्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्री. बसवराज गोवे – बॉम्ब स्कॉड ऑफीसर, श्री. मेहबूब कासार – डेप्युटी जी एस टि कमिशनर, श्री दत्तात्रय मांजरेकर – महापौरांचे निवृत्त खासगी सचिव, पदमश्री श्री. उदय देशपांडे – मलखांब गुरु, श्री दीपक जोशी – स्वामी समर्थ केंद्र, नेत्रदीप संस्थेचे श्री सचिन माने, ऍडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वनाथ टाळकुटे यांचा सन्मान करण्यात आला.
हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय देखणा झाला आणि या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री चंद्रहास रहाटे यांनी केलें. ह्या ३६५ दिवस पूर्ण करण्यासाठी रचना यांना डॉ अमित बागवे, श्री प्रदीप मांजरेकर, श्री संतोष लचके, सौ स्नेहा लचके आणि श्री. लव क्षीरसागर यांची मोलाची साथ लाभली. या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक लोकं प्रेरणा घेत आहेत. Rachna Lachke Bagwe या YouTube Channel वर या सर्व मुलाखती उपलब्ध आहेत. तसेच डॉ अमित बागवे यांच्या नावावर हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशनाचा विश्वविक्रम डिसेंबर २०२० मध्ये नोंदवण्यात आला आहे.
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3
शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi
Superb ❤❤❤