एसी ब्रँड व्होल्टासचा ६८ वा स्थापना दिवस साजरा I

एसी ब्रँड व्होल्टासचा ६८ वा स्थापना दिवस साजरा

भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड व्होल्टासने आपला ६८व्या स्थापना दिवस साजरा करण्याबरोबरीनेच २.७ मिलियन युनिट्सच्या विक्रीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ दरम्यान नोंदवण्यात आलेल्या या विक्रीमध्ये एसीच्या १.४ मिलियन युनिट्सचा देखील समावेश आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

ü ६ ऑगस्ट २०२२ रोजी व्होल्टासने आपला ६८वा स्थापना दिवस साजरा केला.

ü कंपनीने १ मिलियनपेक्षा जास्त वार्षिक विक्रीचा टप्पा करण्याचे हे सलग सातवे वर्ष आहे.

ü व्होल्टास ही निर्विवादपणे बाजारपेठेतील अग्रणी कंपनी असून आपल्या सर्वात जवळच्या स्पर्धकाच्या तुलनेत लक्षणीय आघाडी मिळवत रूम एअर कंडिशनर व्यवसायात त्यांनी आपले प्रथम स्थान कायम राखले आहे.

ü आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, व्होल्टासने एकंदरीत विक्रीमध्ये तसेच एसींच्या विक्रीमध्ये १००% पेक्षा जास्त वृद्धी नोंदवली आहे.

व्होल्टासने बाजारपेठेत आपले नेतृत्वस्थान कायम राखले असून त्याची ठळक वैशिष्ट्ये: (एका थर्ड-पार्टी रिपोर्टनुसार):

ü जुलै २२ च्या आकडेवारीनुसार व्होल्टास रूम एसी विभागात आपल्या सर्वात जवळच्या स्पर्धकापेक्षा १०३० बीपीएसने आघाडीवर आहे.

ü जुलै २२ च्या आकडेवारीनुसार, व्होल्टासची अखिल भारतीय बाजारपेठेतील हिस्सेदारी २४.५% आहे.

मुंबई, १६ सप्टेंबर २०२२: भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड आणि टाटा समूहाचा एक भाग व्होल्टास लिमिटेडने आपला ६८वा स्थापना दिन साजरा करत असतानाच, एअर कंडिशनर विभागात सर्वात जास्त जास्त बाजारपेठ हिस्सेदारी नोंदवली असून जुलै २२च्या आकडेवारीनुसार आपल्या सर्वात जवळच्या स्पर्धकापेक्षा व्होल्टास १०३० बीपीएसने आघाडीवर आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत व्होल्टासने जवळपास १.४ मिलियनपेक्षा जास्त एसी विकले आहेत. १ मिलियनपेक्षा जास्त एसी विक्रीचा लक्षणीय टप्पा सलग सातव्या वर्षी पार करून व्होल्टासने मोठे यश नोंदवले आहे. देशभरात सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने कूलिंग उत्पादनांच्या मागणीत झालेली वाढ तसेच कंपनीने निर्माण केलेले ऑनलाईन व ऑफलाईन वितरणाचे मजबूत नेटवर्क, सर्वात मजबूत ब्रँड इक्विटी आणि एचईपीए फिल्टर असलेल्या भारतातील पहिल्या एसीसह नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या श्रेणीमुळे व्होल्टास लिमिटेडने हे लक्षणीय यश संपादन केले आहे.

व्होल्टास हा ब्रँड रूम एअर कंडिशनर विभागात गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून निर्विवादपणे मार्केट लीडर आहे आणि त्यांनी आपले प्रथम स्थान सातत्याने कायम राखले आहे, त्याबरोबरीनेच आपल्या सर्वात जवळच्या स्पर्धकापेक्षा खूप जास्त पुढे राहून त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात देखील या कंपनीने यश मिळवले आहे. सातत्याने वाढत असलेल्या उत्पादन पोर्टफोलिओला अनुसरून आणि आपल्या स्पर्धकांपेक्षा अधिक जास्त आघाडी मिळवण्यासाठी आपल्या रिटेल व वितरण नेटवर्कमध्ये अजून जास्त वाढ करण्यासाठी हा ब्रँड सातत्याने प्रयत्नशील असतो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सर्व उत्पादन विभागांमध्ये आणि एसी विक्रीमध्ये या कंपनीने १००% पेक्षा जास्त वृद्धी नोंदवली आहे. व्होल्टास आणि अर्सेलिक यांची भागीदारी असलेल्या व्होल्टास बेकोने देखील याच कालावधीत दोन अंकी वृद्धी नोंदवली आहे. कमर्शियल रेफ्रिजरेशन आणि एअर कूलर्सच्या इतर व्यवसाय विभागांमध्ये देखील वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे.

कंपनीच्या कामगिरीविषयी व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. प्रदीप बक्षी म्हणाले, “६८ वर्षांपूर्वी टाटा सन्स आणि व्होल्कार्ट ब्रदर्स यांनी एकत्र येऊन भारतात व्होल्टासची मुहूर्तमेढ रोवली. या इतक्या वर्षांच्या वाटचालीकडे आज मागे वळून बघताना आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. आमच्या सर्व व्यवसायांमध्ये आम्ही नेतृत्वस्थानी आहोतच, इतकेच नव्हे तर ही आघाडी आम्ही खूप मोठ्या मार्जिनने मिळवली आहे. २०२२ च्या उन्हाळ्याने बाजारपेठेत आणि बाजारपेठेतील हिस्सेदारीमध्ये अतिरिक्त आघाडी मिळवण्यात मदत केली. आमचे विशाल नेटवर्क, नव्याने निर्माण होत असलेल्या चॅनेल्सवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण, उत्कृष्ट वितरण नेटवर्क, सर्वात मजबूत ब्रँड इक्विटी आणि ग्राहकांसाठी आम्ही सादर केलेल्या आकर्षक ऑफर्स या बाबी आम्हाला या उद्योगक्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी सहायक ठरल्या आहेत. आजवरच्या प्रदीर्घ वाटचालीत आमच्यावर ठेवलेल्या विश्वास ठेवल्याबद्दल आणि आम्हाला या बाजारपेठेचे निर्विवाद लीडर बनवल्याबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत.”

Voltas
Voltas

About Voltas:

Voltas Limited is a premier air conditioning and engineering solutions provider and a projects specialist. Founded in India in 1954, Voltas Limited is part of the Tata Group, and in addition to Room Air Conditioners, Voltas also has Air Coolers, Air Purifiers, Water Dispensers, Water Coolers, Commercial Refrigeration and Commercial Air Conditioning products in its portfolio. Voltas is one of the leading companies within the Tata group and is the undisputed market leader in room air conditioners in India, with a footprint of over 25,000+ customer touchpoints. It has also recently launched its range of Voltas Beko Home Appliances, through its JV in India, in equal partnership with Arcelik.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *