वी ची खात्री पावसात कोणीही एकटे नसेल: जवळच्या वी स्टोरमध्ये मिळेल आसरा आणि देखभाल

वी ची खात्री पावसात कोणीही एकटे नसेल: जवळच्या वी स्टोरमध्ये मिळेल आसरा आणि देखभाल

न्सून सुरु झाला की जागोजागी पाणी साठणे, वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होणे या समस्यांना मुंबईकरांना सामोरे जावे लागते. कधीही न थांबणारे शहर अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगराची गती धीमी करण्याची ताकद घेऊन पाऊस पुन्हा सुरु झालाय आणि पुढचे काही दिवस भरपूर पर्जन्यवृष्टीचे अनुमान वर्तवण्यात आले आहे. या जिकिरीच्या काळात मुंबईकरांची काळजी घेण्यासाठी देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी पुढे सरसावली आहे. एक अतिशय अनोखा उपक्रम वी ने सुरु केला असून यामध्ये मुंबईभर पसरलेली वी स्टोर्स पावसामुळे घरी पोहोचू न शकणाऱ्या मुंबईकरांना आसरा देतील. पाऊस कमी होऊन, पाणी ओसरेपर्यंत लोकांना वी स्टोर्समध्ये सुरक्षित व आरामशीरपणे थांबता येईल.

मुंबईमध्ये पावसामुळे वाटेत कुठेतरी अडकून राहिले असाल आणि जवळपास कुठे वी स्टोर दिसत असेल तर तिथे जा, वी स्टोरमध्ये तुम्ही सुरक्षित व कनेक्टेड राहाल, तिथे तुम्हाला गरम पेय, खाद्यपदार्थ, प्रथमोपचार आणि चार्जिंग स्टेशन्स या सुविधा मिळतील. पावसामुळे मध्येच थांबून राहावे लागणाऱ्या लोकांना आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहता यावे, महत्त्वाची माहिती मिळवता यावी आणि पाऊस थांबेस्तोवर सुरक्षित जागी आसरा घेता यावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

पावसामध्ये आसरा घेण्यासाठी मुंबईकर गूगल मॅपचा उपयोग करून जवळचे वी स्टोर शोधू शकतील.

‘ग्राहक सर्वप्रथम’ हा वी ब्रँडचा सिद्धांत आहे. चांगल्या तसेच वाईट काळात सदैव ग्राहकांची साथ देण्यासाठी हा ब्रँड कायम तत्पर असतो. शहरातील रिटेल आउटलेट्सच्या सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक वी ने उभारले आहे. मुंबईभर पसरलेली वी स्टोर्स गेली अनेक वर्षे ग्राहकांना सेवासुविधा पुरवत आहेत व शहरातील महत्त्वाची ठिकाणे म्हणून ओळखली जात आहेत. लोकांना प्राधान्य देण्याची आणि जेव्हा त्यांना सर्वात जास्त गरज असेल तेव्हा त्यांच्यासोबत राहण्याची ब्रँडची बांधिलकी वी च्या मान्सून उपक्रमातून दर्शवली जात आहे.

Vodafone stores for Monsoon
Vodafone stores for Monsoon

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3

शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT

18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *