भारतात शाश्वत आणि उत्पादनक्षम ऊस शेतीला चालना देणार I

युपीएल एसएएसची ओएलएएम ग्रीसह भागिदारी, भारतात शाश्वत आणि उत्पादनक्षम ऊस शेतीला चालना देणार

·         युपीएल एसएएस आणि ओलाम अ‍ॅग्री या कंपन्या संयुक्तपणे शाश्वत मिठास हा उपक्रम राबवणार, उत्पादनात १५ टक्क्यांची वाढ करण्याचे उद्दिष्ट.

·         पाण्याचा वापर ३० टक्क्यांनी आणि खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून शाश्वत ऊसशेतीला चालना देण्याचे या प्रकल्पाचे ध्येय

महाराष्ट्र, भारत, ३ ऑगस्ट २०२३ – युपीएल सस्टेनेबल अ‍ॅग्रीकल्चर सोल्यूशन्स प्रा. लि. (युपीएल एसएएस) ही शाश्वत शेती उत्पादने आणि सुविधांची जागतिक पुरवठादार कंपनी असून त्यांनी ओलाम अ‍ॅग्री या खाद्यपदार्थ आणि शेतीव्यसाय पुरवठा क्षेत्रातील कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. देशभरात शाश्वत आणि सातत्यपूर्ण ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी शाश्वत मिठास हा उपक्रम या कराराअंतर्गत राबवला जाणार आहे. ओलाम शुगर मिलच्या (छन्नेहट्टी- राजगोळी, कोल्हापूर, महाराष्ट्र) कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती एकर उत्पादनात १५ टक्के वाढ आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे.

या प्रकल्पाने पाण्याचा वापर ३० टक्क्यांनी कमी करण्याचे ठरवले असून त्यासाठी प्रभावी जलसिंचन पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे. त्याचप्रमाणे खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून पिक उत्पादन वाढवण्याचे आणि मातीचे आरोग्य सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या भागिदारीच्या मदतीने शेतकऱ्यांना सेवा आणि सुविधांचे सर्वसमावेशक पॅकेज मिळवून दिले जाईल. त्यातील प्रोन्युतिवा पॅकेजचा एक भाग म्हणून युपीएलच्या झेबा या क्लायमेट- स्मार्ट तंत्रज्ञानाचा समावेश केलेला असेल. त्याशिवाय गुड अ‍ॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेसचे (जीएपी) प्रशिक्षण, यांत्रिकीकरण, nurture.farm प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे यांचाही त्यात समावेश असेल. या सुविधा आणि पद्धतींची कार्यक्षमता दर्शवण्यासाठी आतापर्यंत २५ मॉडेल प्लॉट्स तयार करण्यात आले आहेत.

UPL SAS Signs MoU with Olam Agri Photo 3
UPL SAS Signs MoU with Olam Agri Photo 3

युपीएल एसएएसच्या सस्टेनिबिलीटी विभागाचे प्रमुख हर्षल सोनावणे म्हणाले, ‘युपीएल एसएएसमधे आम्ही सर्वांसाठी हरित आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या सर्वसमावेशक पॅकेजमुळे शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास तसेच नफा उंचावण्यास मदत होईल. शिवाय, त्यांना पर्यावरणासाठी योगदानही देता येईल. बाजारपेठेतील ऊसाचा अभाव कमी करण्यासाठी ही भागिदारी सर्वांना फायदा मिळवून देण्यासाठी व पिक उत्पादनात दीर्घकालीन शाश्वतता आणण्यासाठी सज्ज आहे.’

ओलाम अ‍ॅग्रीचे व्यवसाय प्रमुख भारत कुंदाल म्हणाले, ‘ओलाम अ‍ॅग्रीमध्ये आम्ही जागतिक शेती आणि खाद्य यंत्रणेची नव्याने रचना करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतीच्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याने ऊस शेतकऱ्यांसमोरची आव्हाने कमी होण्यास मदत होईल. हे एकत्रित प्रयत्न आणि नाविन्याचा वापर करत शेतकरी तसेच संपूर्ण शेती यंत्रणेवर सकारात्मक परिणाम घडवून आणण्याचा निश्चय आम्ही केला आहे.’

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २००० एकरांवर सेवा दिली जाणार असून ७०,००० एकर कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाण्याची क्षमता त्यात आहे.

UPL SAS Signs MoU with Olam Agri Photo
UPL SAS Signs MoU with Olam Agri Photo

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *