युपीएल लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री, रजनीकांत डी. श्रॉफ यांना श्री भगवंथ खुबा यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार I

मुंबइ, ३० सप्टेंबर २०२२ – ११ व्या राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स पुरस्कार सोहळ्यात रसायने आणि खते तसेच नवीन आणि अक्षय उर्जा मंत्रालयाचे मंत्री श्री. भगवंथ खुबा यांच्या हस्ते युपीएल लि. चे संस्थापक श्री. रजनीकांत श्रॉफ यांना रसायने व पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे.

नवी दिल्लीमध्ये झालेल्या या सोहळ्यासाठी श्री. अरूण बरोकारसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सचिवशिशिर सिन्हासंचालक जनरलसीआयपीईटी आणि उद्योगशिक्षण क्षेत्र व आर अँड डी संस्थांचे प्रतिनिधीही यावेळेस उपस्थित होते.

माजी वैज्ञानिक आणि समान संधींचे पुरस्कर्ते असलेले उद्योजक श्री. श्रॉफसीएमडीयुपीएल लि. म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा माझा सन्मान आहे. मी कायमच देशप्रेमी होतो आणि आपल्या महान देशाच्या विकास गाथेचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. हा सन्मान प्रदान केल्याबद्दल मी भारत सरकारचा कृतज्ञ आहे. मी या सन्मानाने भारावून गेलो आहे. इतर पुरस्कारार्थींचेही मी अभिनंदन करतो आणि त्यांनी आपल्या देशाला दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो.

५० वर्षांच्या व्यावसायिक करियरमध्ये श्री. श्रॉफ यांनी भारतात औद्योगीकरण आणि शेतीरसायने क्षेत्र विस्तारण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी दर्जेदार उत्पादने तयार करत देशाच्या परकीय चलनाची बचत केली. एखादे उत्पादन लहान भूधारक शेतकऱ्यासाठीही परवडणारे ठरते तेव्हाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हेतू साध्य होतो असे ते मानतात. एप्रिल २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या पेट्रोकेमिकल्सच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत अशी पुरस्कार योजना भारत सरकारच्या रसायने व पेट्रोकेमिकल्स विभागाने जाहीर केली होती. पॉलीमेरिक साहित्य, उत्पादनेउत्पादन प्रक्रिया अशा राष्ट्रीय व सामाजिक महत्त्वाच्या क्षेत्रात नाविन्य निर्मितीस चालना मिळावी म्हणून ही योजना जाहीर करण्यात आली होती. पेट्रोकेमिकल्स उद्योगाने पर्यावरणपूरक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहावे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्च होते.

११ व्या राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स पुरस्कार सोहळ्यासाठी ३५१ नामांकने आली होती, ज्यामधून विजेते, सहा उपविजेते आणि १ जीवनगौरव पुरस्कार विजेता निवडण्यात आला.

अधिक माहितीसाठी संपर्क

कप्तान माळी

कॉर्पोरेट कम्युनिकेशन

malikr@upl-ltd.com

Mr. Rajnikanth Shroff receiving the award
Mr. Rajnikanth Shroff receiving the award

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *