स्वॅलने भारतातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांसाठी स्पेर्टो (Sperto) हे शाश्वत कीड नियंत्रण उपाय बाजारात आणले I

स्वॅलने भारतातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांसाठी स्पेर्टो (Sperto) हे शाश्वत कीड नियंत्रण उपाय बाजारात आणले I

प्रगत आणि शाश्वत कृषी उपाय पुरविणारी देशातील एक अग्रगण्य कंपनी स्वॅल कॉर्पोरेशन लिमिटेडने स्पेर्टो (Sperto) हे खास सोयाबीन आणि कापसाच्या पिकांसाठी तयार केलेले एक किफायतशीर, शाश्वत आणि नवीन प्रकारचे कीटकनाशक उपाय बाजारात आणल्याची घोषणा केली.

स्पेर्टोमध्ये (Sperto) अॅसेटामिप्रिड २५% आणि बायफेन्थ्रीन २५% वेटेबल ग्रॅन्युअल्स (WG) एकत्रितपणे समाविष्ट आहेत. हे असे पर्यावरणपूरक वेटेबल ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशन (WG) आहे, जे पाण्यामध्ये वेगाने विरघळते आणि योग्य असे कॅनोपी कव्हरेज देऊन सोयाबीन व कापसाच्या पिकांची कार्यक्षमता वाढवते. स्पेर्टो (Sperto) प्रति एकरासाठी तुलनेने कमी प्रमाणात वापरावे लागत असल्याने ते एक किफायतशीर असे उपाय असून ते शाश्वत शेतीला प्रोत्साहन देखील देते. वेटेबल ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशन (WG) मुळे हे हाताळायला सोपे जाते आणि ते वापरत असताना सांडणे, वाहून जाणे  किंवा धूळ बसणे हे धोके कमी होतात. परिणामी या उपायामुळे हवा शुद्ध राहते आणि जमिनीचे आरोग्य देखील चांगले राहते. हे पर्यावरण आणि वापरकर्ते या दोघांसाठी सुरक्षित असल्याने या प्रकारच्या व या किमतीतील अन्य उपायांच्या तुलनेत हे वेगळे ठरते.

पर्यावरणपूरक असलेले हे स्पेर्टो (Sperto) व्हाइट फ्लाय, अॅफिड्स, जॅसिड्स, सेमीलुपर आणि गर्डल बीटल्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांवर परिणामकारक रीतीने नियंत्रण ठेवते. स्पेर्टो (Sperto) दुहेरी फायदा देते. ते कीटक प्रतिकार रोखण्यात मदत तर करतेच शिवाय कीटक व्यवस्थापन पद्धतींमध्ये दीर्घकालीन शाश्वतता सुद्धा देते. तसेच स्पेर्टो (Sperto) वापरल्यास अजून दुसऱ्या काही उपाय योजना करण्याची आवश्यकता देखील कमी होते.

योग्य परिणामांसाठी हे स्पेर्टो (Sperto) खरीप हंगामामध्ये कापसाच्या पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी आणि सोयबिनच्या पेरणीनंतर २०-२५ दिवसांनंतर वापरावे.

          स्वॅलचे व्यवसाय प्रमुख श्री. पंकज जोशी म्हणाले, शेतकऱ्यांना निसर्गाशी सुसंगती आणि पुरकता ठेवीत त्यांच्या शेतीला जतन करण्यास आणि त्याच बरोबर प्रभावीपणे कीड व्यवस्थापन करण्यास सक्षम बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणजे स्पेर्टो (Sperto) बाजारात आणणे आहे. स्पेर्टो (Sperto) च्या वापराने पर्यावरणीय फायदे तर मिळतीलच त्याशिवाय त्या  पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना उत्पादन आणि नफा वाढवण्यास देखील मदत होईल.

About SWAL:  

SWAL Corporation Limited (formerly known as Shaw Wallace Agrochemicals Limited) is one of the pioneers in the Indian Agrochemical Industry and a subsidiary of UPL SAS. Committed to the progress of Indian farmers for more than nine decades, SWAL’s core competency lies in marketing of crop protection solution and fertilizer mixtures. Its People to Farmer (P2F) team encompasses an All-India sales and distribution network of expert technocrats in the field. With a well-orchestrated distribution network spanning 24 stock points and about 4000 dealer outlets ensure availability of products at the right time and the right place.

Sperto - Picture
Sperto – Picture

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *