अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ I
अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांना ‘समाजरत्न पुरस्कार’
मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये ‘मी उद्योजक होणारच…’ हा मराठा उद्योजकांचा भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमात अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री. नारायण राणे यांच्या हस्ते ‘मराठा समाज रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
थायलंड येथे ‘कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’तर्फे अमित बागवे यांना “आर्थिक व उद्योग साक्षरता” विषयावर काम करीत असल्यामुळे डॉक्टरेट या मानद पदवीने गौरविण्यात आले आहे. हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशनाच्या विक्रमासाठी ‘ओ एम जी बुक ऑफ रोकोर्डस’ कडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच ‘इंटरनॅशनल चेंज मेकर अंडर फोर्टी’ पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम., एम. कॉम., एम. ए. मराठी तसेच एम. ए. संस्कृत यांचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स, पत्रकारिता व संमोहन या विषयांचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे.
गुंतवणूक व उद्योजकता या विषयांवर डॉ अमित बागवे यांनी मराठीतून १२ व इंग्रजीतून २ पुस्तके लिहिली आहेत. तसेच ते एक कवी व लेखक असून त्यांचे चारोळी, कविता व ललित लेखावरील पुस्तकही मराठीतून प्रसिद्ध झाले आहे.
महाराष्ट्राच्या उद्योग जगतात प्रचंड मोठे बदल घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ब्रॅंडिंग, सोशिअल मिडिया मार्केटिंग, बिझनेस नेटवर्किंग, नवउद्योजकता, आर्थिक साक्षरता, गुंतवणूक व शेअर मार्केट अशा विविध विषयांवर अर्थसंकेतच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत त्यांनी शेकडो कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात केले आहेत व महाराष्ट्रातील उद्योजकांना प्रगती पथावर येण्यास मदत केली आहे. महाराष्ट्रातील विविध उद्योजकीय संस्था व उद्योजकीय कार्यक्रमांना अर्थसंकेतच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जाते.
महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड अर्थात महाब्रँड, उद्योजकांची दिवाळी पहाट, नवं उद्योजक पुरस्कार, अर्थ साक्षर पुरस्कार, डिजिटल इंडिया, अर्थ जिज्ञासा, अर्थवेध असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी अर्थसंकेतच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आयोजित केले व महाराष्ट्रातील दिग्गज उद्योजकांचे व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनी व वृत्तवाहिनी, आकाशवाणी तसेच इतर रेडिओ चॅनेल यांवर त्यांचे लेख तसेच मुलाखती प्रसिद्ध होत असतात. विविध वर्तमानपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.
अर्थसंकेत हे एक अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र असून छापील आवृत्ती, वेबसाईट, युट्युब चॅनेल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, व्हॉट्सएप यांच्या माध्यमातून आज जवळपास ५० लाख हुन अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलवर १९०० हुन अधिक आर्थिक व व्यावसायिक विषयांवर मोफत मार्गदर्शन करणारे व्हिडीओ उपलब्ध आहेत.
संपर्क – ८०८२३४९८२२
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi