मुंबईचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान I Mumbai cha Raja honoured with Arthsanket Maharashtra Gaurav 2022 I
मुंबईचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान I Mumbai cha Raja honoured with Arthsanket Maharashtra Gaurav 2022
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते मुंबईचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली यांचा ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव’ २०२२ पुरस्काराने सन्मान करण्यात आला I
मुंबईचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली संपर्क – ०२२२४७११४१४
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ. मंडळाची स्थापना सन १९२८ साली झाली. मंडळाचे हे ९२ वे वर्ष आहे.
मंडळाने सन १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात संपुर्ण हिंदुस्थानातील पहिली २२ फुटी गणरायाची उंच उत्सव मुर्ती बनविली व लालबाग हे नाव जगविख्यात केले. त्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात भव्य व नेत्रदिपक अश्या सजावटीवर भर देऊन दक्षिण भारतामधील मदुराई येथील प्रसिद्ध अश्या मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती भविकांसमोर साकारली. अमृतमहोत्सवी वर्षानंतर २२ फुटी उंच गणराया सोबत आकर्षक सजावट हे मंडळाचे समिकरण बनून गेले. त्यामुळेच “लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ-गणेशगल्ली” म्हणजे “भव्यतेची परंपरा व संस्कृतीची जोपासना” हे समिकरण जनमानसात उमटले. हा उत्सव लालबागच्या जनतेचा आणि व्यापारी वर्गाच्या चार आणे वर्गणीतुन सुरु झाला व त्यांच्याच आर्थिक सहकार्यामुळे मंडळाची आज स्वत:च्या कचेरीसाठी प्रशस्त जागा आहे. मंडळाची धुरा पुढे यशस्वीरित्या वाहुन नेण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची मोठी शक्ती आज मंडळाकडे आहे.
मुंबईचा राजा, गणेशगल्लीद्वारे केले जाणारे विविध समाजोपयोगी उपक्रम
रक्तदान शिबीर :
रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान या उक्तीचा आधार घेऊन मंडळ गेली १५ वर्षे रक्तदान शिबीर आयोजित करत आले आहेत. के.ई. एम रक्त पेढी, नायर रुग्णालय, जे. जे. महानगर रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर सुरळीत पार पाडले जाते. रक्तदात्यास मंडळाच्या वतीने आकर्षक भेट वस्तु देण्यास येते, सुमारे १००० ते १५०० रक्तदाते सदर उपक्रमात सहभागी होतात
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी :
मार्च २०२० या वर्षी उद्भवलेल्या कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराची जी वैश्विक समस्या निर्माण झाली त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे साहेब ह्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुंबईच्या राजाच्या वतीने रु.५,००,०००/- मात्र धनादेश महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता सुपूर्त करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रामधील पूरग्रस्त नागरिकांना मदत :
उपरोक्त मंडळाच्या वतीने ऑगस्ट २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली इत्यादी भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व बरीच कुटुंबे बेघर होऊन तेथिल दैनंदीन जीवन विस्कळीत झाले होते. अश्या बिकट प्रसंगी मंडळाच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना ₹३,००,०००/- पर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
चिपळूण मधील अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत :
उपरोक्त मंडळाच्या वतीने जुलै२०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील अपघातग्रस्त कुटुंबियांना ₹५,००,०००/- पर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः त्या घटनास्थळी भेट देऊन तेथील कुटुंबियांना त्यांच्या दैनंदीन गरजेच्या वस्तू देऊन त्यांना मदतीचा हात दिला.
जांभुळपाडा मदतकार्य :
१९८१-९० सालामध्ये पनवेल येथील जांभुळ पाडा या आदिवासी वस्ती असलेल्या गावाला पुराचा भयंकर तडाका बसला. त्यांचे संपुर्ण जनजीवन विस्कळत झाले त्यांच्या हाकेला धावून जात मंडळाने तातडीने मदत कार्य सुरु केले. जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी वाटप करुन विस्कळीत झालेले त्यांचे जीवन पुन्हा एकदा स्थिरस्थावर करण्यात मंडळाचा मोलाचा वाटा आहे.
कारगिल रिलीफ फंड :
नैसर्गिक आपत्ती बरोबर अस्मानी आपत्तीतसुध्दा मंडळ नेहमी मदतकार्यास पुढे आहे. कारगिल युध्दाच्या वेळी जवानांनी प्रणाची बाजी लावुन देशाचे रक्षण केले. सरकारने केलेल्या आव्हानानुसार मंडळाने ₹१,००,००० (एक लाख रुपये) कारगिल रिलीफ फंडाकरिता दिले.
महाड – चिपळुण तालुक्यात शैक्षणिक मदत :
२६ जुलै २००७ साली संपुर्ण महाराष्ट्राने निसर्गाचा कोप अनुभवला. महाड – चिपळुण तालुक्यांना तर निसर्गाने अक्षरश: झोडपुन काढले. नद्यांना आलेला पुर, तसेच दरडी कोसळून झालेले नुकसान फार भयंकर होते. संपुर्ण देशातुन मदतीचा शोध सुरु झाला. सदर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचे पुनर्वसन महत्वाचा विषय बनला. यावेळी मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वहया, पुस्तके, दप्तर, गणवेश व इतर शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. दासगाव, जुई, चिपळुण, ई. गावांमध्ये मदत कार्य सुरु राहिले.
आदिवासी पाड्यामध्ये मोफत साडी वितरण आयोजन:
दर वर्षी नवरात्रौत्सवामध्ये लालबागच्या मातेला भाविकांकडून मनोवांचित इच्छा पूर्ण झाल्या निमित्ताने साड्यांचा नवस दिला जातो. स्त्री-शक्तीचा सन्मान करून उपरोक्त मंडळाच्या वतीने राज्यातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये भाविकांनी लालबागच्या मातेला अर्पण केलेल्या साड्यांचे मोफत वितरण करण्यात येते.
के. ई. एम स्ट्रेचर व्हील चेअर वाटप :
के. ई. एम रुग्णालयातील वाढती रुग्णांची गर्दी लक्षात घेता रुग्णांच्या सोयीकरता रुग्णालयात स्ट्रेचर व व्हील चेअर चे लोकार्पण करण्यात आले. प्रती वर्षी उपयोगी वस्तुंचे लोकार्पण करण्याचा मंडळाचा मानस आहे.
मुंबईचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली संपर्क – ०२२२४७११४१४
शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘महाराष्ट्र गौरव’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला
अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/
अर्थसंकेत संपर्क – http://Wa.me/+918082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi