मिंडा कॉर्पोरेशनतर्फे लोकोनॅव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसह वेब-अँड्रॉइड/आयओएस प्लॅटफॉर्मसाठी टेलिमॅटिक्स सॉफ्टवेयर लायसन्स करार केल्याची घोषणा I
दिल्ली/एनसीआर, २२ नोव्हेंबर २०२२ – मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड (मिंडा कॉर्प किंवा कंपनी NSE: MINDACORP, BSE: 538962 नावाने ओळखली जाणारी) या स्पार्क मिंडा समूहाच्या प्रमुख कंपनीने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी लोकोनॅव्हशी टेक्नॉलॉजी लायसन्स करार केल्याची आज घोषणा केली. वेब आणि अँड्रॉइंड/आयओएस प्लॅटफॉर्म्सवर टेलिमॅटिक्स सॉफ्टवेयरच्या व्हाइट लेबलिंगसाठी हा करार करण्यात आला आहे.
स्पार्क मिंडा लोकोनॅव्हने विकसित केलेले सॉफ्टवेयर आपल्या कंपनीअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या टेलिमॅटिक उपकरणासह एकत्रित करून ओईएमबरोबर संपूर्ण सुविधा देईल. या सहकार्यामुळे स्पार्क मिंडाला भारतीय ओईएमसाठी योग्य असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात कस्टमाइज्ड सुविधा देऊन आघाडीवर राहाता येईल.
या सहकार्याचा एक भाग म्हणून लोकोनॅव्ह टेलिमॅटिक्स सिस्टीम्साठी स्पार्क मिंडाची तंत्रज्ञान भागीदार असेल आणि व्हाइड लेबल्ड सॉफ्टवेयर पुरवेल. लोकोनॅव्हद्वारे स्पार्क मिंडाला सॉफ्टवेयर कस्टमायझेशनमध्ये तसेच वेळोवेळी लागणारा पाठिंबा आणि मोबाइल अप्लिकेशन युजर इंटरफेजसह मदत केली जाईल.
या टीएलएविषयी मिंडा कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. आकाश मिंडा म्हणाले, ‘कनेक्टिव्हिटी व्हिईकल्स हा वाहन क्षेत्रातील मोठा ट्रेंड आहे आणि संपूर्ण टेलिमॅटिक्स सुविधा या मोठ्या ट्रेंडच्या केंद्रस्थानी आहे. स्पार्क मिंडामध्ये आही पुढे जाऊन भारतीय ओईएम्सना स्थानिक स्तरावर विकसित केलेल्या टेलिमॅटिक्स सुविधा(स्थानिक पातळीवर तयार केलेले हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर वापरून)टेलिमॅटिक्स सुविधापुरवणार आहोत, ज्यामुळे वाहनांमध्ये 24*7 कनेक्टिव्हिटी मिळेल. लोकोनोव्हबरोबर केलेल्या भागिदारीमुळे आम्हाला स्पार्क मिंडाच्या उपकरणात लोकोनॅव्हचे प्रमुख टेलिमॅटिक्स सॉफ्टवेयर एकत्र करून कंपनीचे ‘सर्व प्रकारच्या मोबिलिटी सुविधांची पुरवठादार’ कंपनीत रुपांतर करता येईल व पर्यायाने आघाडीच्या ओईएम्सबरोबर असलेले आणखी नाते बळकट करता येईल असे वाटते.’
२०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेली एआय- आधारित, भारतीय वंशाची फुल- स्टॅक तंत्रज्ञान कंपनी लोकोनॅव्ह आपल्या ग्राहकांना टेलिमॅटिक्स सॉफ्टवेयर, सबस्क्रिप्शन आणि टेलिमॅटिक्स उपकरणे पुरवते व त्यात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम उपकरणे, डॅशकॅम पकरणे आणि फ्युएल सेन्सर्स उपकरणांसह इतर विविध उपकरणांचा समावेश आहे. कंपनी प्रत्येक व्यवसायासाठी फ्लीट ऑपरेशन्स सफाईदार बनवण्याच्या ध्येयासह वाहन व्यवस्थापनाचा समावेश करण्यात कंपनी तज्ज्ञ आहे.
टीएलएविषयी लोकोनॅव्हचे सह- संस्थापक श्री. श्रीधर गुप्ता म्हणाले, ‘आम्हाला ठाम विश्वास वाटतो, की लोकोनॅव्हची सॉफ्टवेयर सोल्यूशन्स आणि स्पार्क मिंडाचे टेलिमॅटिक्स उपकरणांची निर्मिती करण्यातले कौशल्य एकत्रितपणे दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल. यामुळे इंटिग्रेटेड टेलिमॅटिक्स सेवांसाठी विशेषतः भारतीय बाजारपेठेसाठी आम्हाला पसंती मिळेल. स्पार्क मिंडाचे गेल्या दशकभरापासून सर्व प्रमुख ओईएमसह असलेले नाते आणि लोकोनॅव्हचे सखोल सॉफ्टवेयर कौशल्य एकत्रितपणे हे सहकार्य विस्तारण्यासाठी लाभदायक ठरेल. ही भागिदारी भारतीय वाहन उद्योगातील सर्व भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल.’
ही भागिदारी भारतात कनेक्टेड मोबिलिटी इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी संभाव्य भागिदारीचे उत्तम उदाहरण आहे.
About Minda Corporation (BSE:538962; NSE: MINDACORP)
Minda Corporation is one of the leading automotive component manufacturing companies in India with a pan-India presence and significant international footprint. The Company was incorporated in 1985. Minda Corporation is the flagship company of Spark Minda, which was part of the erstwhile Minda Group. The Company has a diversified product portfolio that encompasses Mechatronics; Information and Connected Systems and Plastic and Interior for auto OEMs. These products cater to 2/3 wheelers, passenger vehicles, commercial vehicles, off-roaders and after-market. The Company has a diversified customer base including Indian and global original equipment manufacturers and Tier-1 customers.
For assimilating the latest technologies, Minda Corporation has a dedicated R&D facility and collaborations with the pioneers and leaders of the automobile industry. This has provided Minda Corporation with the cutting-edge in product design and technology to meet strict international quality standards.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi