COP27 च्या आधी आर्थिक वर्ष २३ मध्ये गोदरेज इंटेरिओने हरित उत्पादनांमधून मिळविला ४७% महसूल I

COP27 च्या आधी आर्थिक वर्ष २३ मध्ये गोदरेज इंटेरिओने हरित उत्पादनांमधून मिळविला ४७% महसूल

· शाश्वत उत्पादनांप्रती आत्मीयता वाढत असल्याचे प्रवाह दर्शवितो

· २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा उपक्रमांमध्ये ५० कोटी रुपये गुंतवण्याची घोषणा

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने घरगुती आणि संस्थात्मक विभागांमध्ये भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन ब्रँड असलेल्या त्यांच्या व्यवसाय शाखा गोदरेज इंटेरिओने आर्थिक वर्ष २३ मध्ये चांगल्या आणि हरित उत्पादनांमधून ४७% महसूल मिळवत पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ उत्पादनांच्या मागणीत वाढ झाल्याचे जाहीर केले. गेल्या आर्थिक वर्षात, गोदरेज इंटेरिओने गुड अँड ग्रीन उत्पादनांमधून ४१% महसूल मिळवला. गोदरेज अँड बॉयसचा वर्षभरातील उत्पन्नाच्या एक तृतीयांश महसूल गुड अँड ग्रीन उत्पादनांद्वारे मिळविण्याचा मानस आहे.

२०३० च्या कॉर्पोरेट वचनबद्धतेच्या टाइमलाइनच्या आधी गोदरेज इंटेरिओ २०३० पर्यंत आपली ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्यासाठी आणि २०२४ पर्यंत आपल्या सर्व उत्पादन प्रकल्पांमध्ये ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली (ईएमएस) लागू करण्यासाठी कटिबद्ध आहे. या व्यतिरिक्त, गोदरेज इंटेरिओने खालापूरमध्ये नवीन सुविधा केंद्राची भर पडल्यावरही आर्थिक वर्ष २०१०-११ च्या गुड अँड ग्रीन व्हिजन बेसलाइनवर आधारित आपला विशिष्ट ऊर्जा वापर ३७% नी कमी केला आहे. २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा उपक्रमांमध्ये ५० कोटी रुपये गुंतवण्याची कंपनीची योजना आहे.

पुढे, गोदरेज इंटेरिओने वसुंधरेवरील भार कमी करण्यासाठी सर्व उत्पादन स्थानांवर विविध तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. या तंत्रज्ञानामध्ये पंप आणि ब्लोअरवर VFDs (व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह) चा वापर, उष्मा पाईप सारख्या कचरा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर, उष्णता पंपाचा वापर, ऊर्जा कार्यक्षम मशीनची स्थापना आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाशव्यवस्था इत्यादींचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, गोदरेज इंटेरिओच्या प्रकल्पामधील पाण्याचे पुनर्वापर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) किंवा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स (ETP) द्वारे केले जात आहे. खालापूर, चेन्नई आणि भगवानपूर येथे रिव्हर्स ऑस्मोसिस सारख्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे ईटीपीद्वारे पुनर्वापर केलेले पाणी उत्पादन प्रक्रियेत पुन्हा वापरण्यासाठी तयार केले जाते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सुमारे ६९,९०७ किलोलिटर पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आणि हे प्रमाण इंटेरिओच्या उत्पादन प्रकल्पातील एकूण गोड्या पाण्याच्या वापराच्या ४०% आहे. ब्रँडने आगामी वर्षांत भरीव पातळी गाठून ही टक्केवारी अधिक चांगली करण्याची योजना आखली आहे. गोदरेज इंटेरिओमध्ये, विविध प्रक्रियांद्वारे पुनर्वापर केलेले पाणी एकूण पाण्याच्या वापराच्या २८% पर्यंत आहे.

शाश्वत उपक्रमावर भाष्य करताना गोदरेज इंटेरिओचे व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर म्हणाले, “गोदरेज इंटेरिओमध्ये, आमचा ठाम विश्वास आहे की नावीन्यपूर्णता आणि शाश्वतता एकत्र असणे आवश्यक आहे. म्हणूनच आमचे शाश्वतता धोरण गोदरेज आणि बॉयसच्या “गुड अँड ग्रीन” ध्येयाशी सुसंगत आहे. दोन्ही एकत्र केल्याने समुदाय विकास, ऊर्जा कार्यक्षमता, रोजगारक्षमता आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळावे यासाठीच्या आमच्या प्रयत्नांमध्ये प्रगती होईल. कमी कार्बन उत्सर्जनासाठी भारताच्या दीर्घकालीन धोरणाशी जुळवून घेत EP100 उपक्रमासारख्या जागतिक कारणांसाठी योगदान देण्याचा आणि कटिबद्ध राहण्याचा आम्हाला अभिमान आहे. गोदरेज इंटरिओ मध्ये स्मार्ट ऊर्जा वापराचा मार्ग अवलंबून ही वचनबद्धता आम्ही आणखी दृढ करू शकतो.”

गोदरेज आणि बॉयस २०३० पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि EP100 चा भाग म्हणून २०३० पर्यंत कार्बनची तीव्रता ६०% ने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शाश्वत पृथ्वी आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने गोदरेज अँड बॉयसची बांधिलकी आहे.

शिरवळ आणि हरिद्वारमधील उत्पादन प्रकल्पांनी अनुक्रमे ३६० kW आणि ३२९ kW रुफ-टॉप सोलर पॅनेल स्थापित केले आहेत. गोदरेज इंटेरिओला एकूण ऊर्जा वापरापैकी १३% ऊर्जा अक्षय ऊर्जा स्रोतातून मिळते. विक्रोळी, शिरवळ, भगवानपूर, चेन्नई आणि हरिद्वार येथील प्रकल्प ISO 50001:2018 प्रमाणित आहेत. यामुळे उर्जेचा वापर कमी होण्यास आणखी मदत होईल.

Godrej Interio_Brand Logo
Godrej Interio_Brand Logo

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *