मी उद्योजक होणारच – मराठा उद्योजकांच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद I
मी उद्योजक होणारच – मराठा उद्योजकांच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये ‘मी उद्योजक होणारच…’ हा मराठा उद्योजकांचा भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडला. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक उपस्थित राहिले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. यासाठी आणखी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाजातील तरुणांनी उद्योजक बनून रोजगार निर्मितीही करणे गरजेचे आहे, कारण आरक्षणाचा लढा जरी जिंकला, तरी सर्वानाच शासकीय नोकरी मिळणे शक्य नाही. शासकीय पदांची संख्या आणि बेरोजगारांची संख्या यात मोठी तफावत आहे. त्यामुळे उद्योजक होण्याचेही ध्येय तरुणांनी मनाशी बाळगले पाहिजे, असे मत उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केले.
या मेळाव्यास केंद्रीय MSME मंत्री श्री. नारायण राणे साहेब, उद्योगमंत्री श्री. उदय सावंत साहेब , उदयोजकता मंत्री श्री. लोढ़ा साहेब,आ. श्री. प्रसाद लाड, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील, आई पी एस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, मराठा समाजातील उच्चपदस्थ अधिकारी, विख्यात उद्योजक उपस्थित होते.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी,समृद्धीसाठी राज्यातील जास्तीत जास्त मराठा समाज शेती व नोकरीत न अडकता उद्योजक झाला पाहिजे. आरक्षणाच्या पलीकडे अर्थकारण हे वास्तविक जग आहे, हे समजून घेऊन मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. मराठा समाजाला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नव उद्योजक घडवण्यासाठी समाजातील उद्योजक व्यावसायिक व्यापारी व नवउद्योजक या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी “मी उद्योजक होणारच” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या १२ वर्षापासुन “मी उद्योजक होणारच…” या कार्यक्रमात आत्तापर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक लोकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन तब्बल २५ लाख लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहचला आहे. आत्तापर्यंत “मी उद्योजक होणारच…” या कार्यक्रमाचे आयोजन ताज हॉटेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, षण्मुखानंद, या सारख्या असंख्य मोठया ठीकाणी झाले आहे. तसेच मराठी बिल्डर (बांधकाम व्यवसायिक) यांच्याकरिता, कोकण उद्योजकता, महिला उद्योजकता, विद्यार्थी उद्योजकता, स्टार्टअप, फायनानशिअल उपक्रम, ग्रामिण उद्योजकता, एज्युकेशन – प्रॉपर्टी – कनझ्युमर एक्झीबिशन, काईट फेस्टीवल या सारखे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे