मराठा समाजातील महिलांचा उद्योग जागर I मराठा उद्योजक लॉबीचा उपक्रम I
मराठा समाजातील महिलांचा उद्योग जागर I मराठा उद्योजक लॉबीचा उपक्रम I
आपण जेव्हा या जगाचा निरोप घेऊ तेव्हा आपल्यापाठी आपले दागिने, साड्या, संसार आणि मुलांव्यतिरिक्त आपण काही निर्माण केलेले अस्तित्वात राहिले पाहिजे तेच आपल्या जीवनाचे सार्थक होईल – सौ रचना बागवे (सह संस्थापक अर्थसंकेत)
रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी मराठा उद्योजक लॉबी या संवस्थेने मराठा समाजातील महिलांनी उद्योजकतेकडे वेळावे आणि आपला व्यवसाय वाढवावा या करिता एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि मला तेथे महिलांना मार्गदर्शनासाठी प्रमुख वक्ता म्हणून बोलविण्यात आले होते.
मराठा व्यवसायिकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला व्यवसायीक घडविण्याचा मानस असून, यातून महिलांना आर्थिक सक्षम करणे हे मुख्य ध्येय आहे. मराठा समाज एका बाजूला आरक्षणाची मागणी करत असताना, समाजातील तरुणांनी व्यवसायीक व्हावे म्हणून मराठा उद्योजक लॉबी गेली ५ वर्षे सातत्याने काम करत आहे.
एक एक मराठा बांधव असे आज फेसबुकच्या माध्यमातून ५ लाख मराठा व्यवसायीक जोडले गेलेले आहे, व्हाट्सएपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात १७०० समूह असून या माध्यमातून मोठी व्यवसायीक खरेदी विक्री होत असते. याच प्रमाणे अडीअडचणीच्या वेळी समाजासाठी धावून जाणारी मोठी तरुणांची फळी या माध्यमातून उभारलेली आहे. येणाऱ्या भविष्यात हजारो तरुण/तरुणी व्यवसायीक बनवून त्यांच्या व्यवसाय कायमस्वरूपी चालत राहावा यासाठी मराठा उद्योजक लॉबी सदैव प्रयत्न शील असते व राहील.
असाच एक प्रयत्न म्हणून गोरेगाव येथे मराठा समाजातील महिलांसाठी व्यवसायीक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मराठा समाजातील महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असावे, उपस्थित महिलांना व्यवसायीक मार्गदर्शन तसेच आजच्या परिस्थितीत व्यवसाय कशा प्रकारे करावा, व्यवसायात नारी शक्तीचे सामर्थ्य या बद्दलचे मार्गदर्शन आघाडीच्या व्यवसायिका / लेखिका सौ.रचना बागवे यांनी केले. पै पै करून मेहनतीने साठवलेला पैसा लहान लहान गुंतवणूक करून कशा प्रकारे मोठे रिटर्न घेता येतील याची माहिती श्रीमती रश्मी शिंदे यांनी दिली, तसेच खडतर प्रवास करून शून्यातून व्यवसाय सुरुवात करून पुण्यासारख्या ठिकाणी आज स्वतःची ३ हॉटेल्स असणाऱ्या सुप्रिया जगताप यांनी आयुष्याचा खडतर प्रवास उपस्थित महिलांच्या समोर मांडला, या शिबिरा साठी संस्थापक विनोद बढे यांनी १० भाग्यवंत महिलांना व्हाट्सएपच्या ऑटो रिप्लाय भेट म्हणून दिले, मोरणी पैठणी यांनी १० पैठणी भेट म्हणून दिले तसेच विनोद शिंदे यांनी ३ भाग्यवंत महिलांना हेलिकॉप्टर हवाई सफर करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
गेली ५ वर्षे सातत्याने यशस्वी व्यवसाय करत असलेल्या शून्यातून विश्व निर्माण करत असलेल्या १५ महिलांनाचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले, त्यांचे अनुभव, मार्गदर्शन उपस्थित महिलांना मिळाले.
कार्यक्रमाचे नियोजन, सौ.ज्योती देशमुख, सौ.ऋतुजा गुजर, सौ.पूजा पाटील, सौ.सायली जाधव, सौ.श्वेता चव्हाण, सौ.ज्योती बागवे यांनी केले , संपूर्ण उपक्रमात ४०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवला, या उपक्रमात अंकित प्रभू यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तसेच मराठा उद्योजक लॉबी महिला महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.छाया इंदुलकर, मुंबई-कोकण संपर्क प्रमुख कृषिराज चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख वैभव फरतडे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री.श्रीकांत आम्ले, दिनेश चासकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष – विपुल शेवाळे, कल्याण जिल्हा अध्यक्ष – मंगेश शेळके, नवी मुंबई शहर संघटक – अनिल जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमाची संकल्पना मराठा उद्योजक लॉबी मुंबई अध्यक्ष श्री.कल्पेश शेलार यांनी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi