माजघर पुस्तक प्रकाशन सोहळा I Majghar Book Publication Ceremony I
माजघर पुस्तक प्रकाशन सोहळा I Majghar Book Publication Ceremony I
शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकोचे श्री संजीव पेंढारकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष श्री शंतनू भडकमकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे व श्रीमती सोनल लोहरीकर यांच्या हस्ते ‘माजघर’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न !
माजघर – एक पारंपरिक खाद्य संस्कृतीआजच्या पिढीला पारंपरिक खाद्य संस्कृती, पाककला अणि परंपरेची ओळख व्हावी म्हणून माजघर! हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात फक्त उदरभरणची सोय म्हणून स्वयंपाक घराची ओळख राहिली आहे. खरं तर माजघर म्हणजे प्रत्येकाच्या घरातील एक अशी जागा जिथुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात शिरण्याचा रस्ता जातो अणि जिथे घर आनंदी राहण्याची गुरुकिल्ली सापडते. त्याचीच ओळख अणि आठवण करून देण्याचा एक प्रयत्न ह्या पुस्तकात द्वारे केला आहे. ह्यातील पाककृती संपूर्ण शाकाहारी असुन प्रत्येक महिन्यानुसार आरोग्यदायी पदार्थ ध्यानात ठेवून, साध्या व सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत. कुठल्या महिन्यात कुठल्या भाज्या किंवा फळे खावेत, त्याचे फायदे काय ह्याचा देखील समावेश केला आहे.श्रीमती. सोनल लोहरिकरDirector of SDF PRODUCTIONS PVT LTD.
पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ९५६१४७६८५०
अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे