महिंद्रा लॉजिस्टिक्सचे उत्पन्न आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत १३२६ कोटी रुपयांवर I
महिंद्रा लॉजिस्टिक्सचे उत्पन्न आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत १३२६ कोटी रुपयांवर, आर्थिक वर्ष २२ च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २८ टक्क्यांची वाढ
आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीतील करोत्तर नफा ११ कोटी रुपये
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२२ – महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या भारतातील आघाडीच्या सर्वसमावेशक, लॉजिस्टिक्स आणि मोबिलिटी सुविधा पुरवठादार कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि सहामाहीतील एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
आर्थिक वर्ष २२ च्या दुसरी तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ मधील दुसऱ्या तिमाहीची कामगिरी
- उत्पन्न १०३३ कोटी रुपयांवरून १३२६ कोटी रुपयांवर
- ईबीआयटीडीए ४९ कोटी रुपयांवरून ७१ कोटी रुपयांवर
- करपूर्व नफा ८ कोटी रुपयांवरून १७ कोटी रुपयांवर
- करोत्तर नफा ५ कोटी रुपयांवरून ११ कोटी रुपयांवर
- ईपीएस (डायल्युटेड) ०.७१ च्या तुलनेत १.६९ वर
आर्थिक वर्ष २२ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या सहामाहीतील कामगिरी
- उत्पन्न १९१६ कोटी रुपयांवरून २५२६ कोटी रुपयांवर
- ईबीआयटीडीए ९२ कोटी रुपयांवरून १४० कोटी रुपयांवर
- करपूर्व नफा १४ कोटी रुपयांवरून ३६ कोटी रुपयांवर
- करोत्तर नफा ८ कोटी रुपयांवरून २५ कोटी रुपयांवर
- ईपीएस (डायल्युटेड) १.१६ च्या तुलनेत ३.५६ वर
आर्थिक वर्ष २२ मधील आकडेवारी आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीत मेरू कंपनीजचे संपादन केल्यानंतर पुन्हा तयार करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
· तिमाहीतील वाढीला वाहन उद्योगाची स्थिती पूर्ववत होत असल्याने आणि दूरसंचारसह उपभोगयोग्य वस्तूंच्या बाजारपेठेतील शाश्वत विकासामुळे चालना मिळाली.
· बीटुबी एक्सप्रेसमध्ये झालेली स्थिर वाढ आणि लास्ट माइल डिलीव्हरी (ईडेलसह) सेवा.
· मोबिलिटी व्यवसाय कोविड- पूर्व पातळीपर्यंत पोहोचलेला नसला, तरी त्याची कार्यकारी क्षमता सुधारत आहे.
· तिमाहीमध्ये आम्ही नाशिक, भिवंडी आणि लुहारीसारख्या ठिकाणी १ दशलक्ष चौरस फुटांची वेयरहाउसेस उपलब्ध करून दिली आहेत.
या कामगिरीविषयी महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘उत्पन्नात वार्षिक पातळीवर २८ टक्के वाढीसह आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत आमचा विकास कायम आहे. वाहन क्षेत्राची स्थिती उंचावल्यामुळे तसेच पर्यायाने इतर क्षेत्रेही पूर्वपदावर येत असल्यामुळे आमचाही व्यवसाय सुधारला आहे. ३पीएल कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्सशिवाय आम्ही लास्ट माइल आणि बीटुबी एक्सप्रेसमध्ये गुंतवणूक केली असून तिथे चांगली वाढ दिसून येत आहे. तिमाहीदरम्यान आम्हाला महागाई, फ्रंटलाइन मनुष्यबळ खर्चात झालेली वाढ, ट्रेलर आणि कार कॅरियर्स पुरवठ्याचा तुडवडा या सर्वांचा परिणाम जाणवला. जागतिक मंदीसदृश ट्रेंड्स, किंमतीतील अस्थिरता आणि एकंदर महागाईनुसार लघुकालीन कामकाजाच्या वातावरणावर परिणाम होत असला, तरी आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वतोपरी सेवा देत आहोत. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणामुळे या क्षेत्रात बदल घडून येतील, डिजिटायझेशन, मल्टी मोडाल लॉजिस्टिक्स वाढेल आणि लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल.’
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi