महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे लास्ट- माइल डिलीव्हरीजसाठी महिला ई- बाइक रायडर्सची नियुक्ती I

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे लास्ट- माइल डिलीव्हरीजसाठी महिला ई- बाइक रायडर्सची नियुक्ती

मुंबई१३ जानेवारी २०२३ – महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) ही भारतातील सर्वसमावेशक लॉजिस्टिक्स आणि वाहतूक सेवा पुरवणारीकर्मचारी वर्गाच्या बाबतीत डीईआयवर (Diversity, Equity, and Inclusion) तत्वांनुसार काम करणारी कंपनी आहे. एमएलएलने आज आपल्या लास्ट- माइल डिलीव्हरीजसाठी महिला ई- बाइक रायडर्सशी करार केला असून त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने समानता साध्य करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करतसर्व प्रकारच्या कामांमध्ये त्यांचा समावेश करत लॉजिस्टिक्स क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. महिलांना समान संधी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचे कंपनीने ठरवले असून त्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्रातील अपारंपरिक कामांतही त्यांना सहभागी करून घेत स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत केली जाणार आहे.

हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीने उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, बेंगळुरू आणि नागपूर येथील लास्ट माइल डिलीव्हरी क्षेत्रात ११ महिला रायडर्सची नियुक्ती केली आहे. ही प्रक्रिया आणखी कार्यक्षम बनवत उपक्रमाच्या दमदार अमलबजावणीसाठी महिंद्रा लॉजिस्टिक विशेषत्वाने प्रयत्न करत आहे. त्याशिवाय कंपनी महिला उमेदवारांना ई-  बाइक सुरक्षितपणे चालवण्यासाठीलास्ट माइल डिलीव्हरी हाताळण्यासाठी तसेच सॉफ्ट स्किल्स आत्मसात करण्यासाठी खास प्रशिक्षण देत आहे.

कंपनी या महिला रायडर्सच्या सुरक्षेसाठी बांधील असून त्यासाठी त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग बसवण्यात येणार आहे. यामुळे बाइक दीर्घकाळ थांबलेली असणे किंवा नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग घेतला जाणे अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करणे एमएलएलला शक्य होईल.

या घोषणेविषयी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, लास्ट- माइल डिलीव्हरीसाठी महिला ई- बाइक रायडर्सची नेमणूक करण्यात आघाडीवर असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. हा कर्मचारी वर्गात लिंग विविधता आणण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. आमच्या मते समान संधींमुळे कामाचे ठिकाण जास्त उत्पादनक्षम आणि यशस्वी होते. अशाप्रकारच्या लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकणाऱ्या उपक्रमाच्या आघाडीवर राहिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून आम्ही अधिकाधिक महिला रायडर्स, फ्लीट ओनर्स आणि इतर वाहतुकदारांची नेमणूक करण्यावर एमएलएलमध्ये लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अधिक मोठ्या राईज उपक्रमासाठी आम्ही बांधील असून स्त्रियांना प्रगती करण्यासाठीत्यांच्या कौशल्यांसाठी योगदान देण्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

Mahindra Logistics Female e bike riders
Mahindra Logistics Female e bike riders

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *