महिंद्रा लाईफस्पेस हॅप्पीनेस्ट तथवडेच्या फेज ३ चा शुभारंभ
महिंद्रा लाईफस्पेसेसने पुण्यात आपले स्थान अधिक मजबूत केले, हॅप्पीनेस्ट तथवडेच्या फेज ३ चा शुभारंभ
– या प्रकल्पाच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, फेज ३ आधी ठरवलेल्या वेळेच्या आधी सुरु केला जात आहे.
– प्रकल्पाच्या आत रिटेल व व्यापारी जागांचा शुभारंभ.
महिंद्रा ग्रुपमधील रियल इस्टेट आणि पायाभूत सोयीसुविधा विकास कंपनी महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडने (एमएलडीएल) पुण्यातील पहिले ‘फ्युजन होम्स’ – महिंद्रा हॅप्पीनेस्ट तथवडे प्रकल्पाच्या तिसऱ्या फेजच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या फेजमधील बहुतांश घरे विकली गेली असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मायक्रो बाजारपेठेतील हा एक सर्वाधिक वेगाने विकला जात असलेला प्रकल्प ठरला आहे. फेज १ चे बांधकाम आधी ठरवण्यात आलेल्या वेळेच्या आधी होत असल्याने घरांचा ताबा २०२५ पासून देण्याची योजना आहे. महिंद्रा हॅप्पीनेस्ट तथवडेच्या तिसऱ्या फेजमध्ये ६१९ ते ७०२ चौरस फीट कार्पेट क्षेत्रफळाची २ बीएचके घरे असून त्यांच्या किमती ६६ लाख रुपयांपासून पुढे आहेत.
या शुभारंभाचा एक भाग म्हणून महिंद्रा लाईफस्पेसेस या प्रकल्पाच्या आत रिटेल व व्यापारी जागा देखील उपलब्ध करवून देत आहे. त्यामुळे याठिकाणी घर खरेदी करणाऱ्यांना सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज ठिकाण निवडल्याचे समाधान मिळेल. रिटेल जागांमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध करवून दिले जातील, मिडीयम ते स्मॉल अशा विविध फॉरमॅटची रिटेल दुकाने याठिकाणी उपलब्ध असतील. अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या, ग्राहकांचा एकंदरीत जीवनशैली अनुभव वृद्धिंगत करणाऱ्या, सोयीसुविधा आणि सेवांचा आपल्या प्रकल्पामध्ये समावेश करण्यासाठी महिंद्रा लाईफस्पेसेस वचनबद्ध आहे.
महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडचे चीफ सेल्स आणि सर्व्हिस ऑफिसर श्री. विमलेन्द्र सिंग यांनी सांगितले, “पुणे ही प्रत्यक्ष घर खरेदीदारांच्या मागण्यांमुळे चालना मिळत असलेली एक आघाडीची निवासी बाजारपेठ आहे. आम्ही पुण्याला नेहमीच एक महत्त्वाचे मार्केट मानत आलो आहोत. सामाजिक व शहरी पायाभूत सोयीसुविधांचा विकास, रोजगार संधींमधील वाढ आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीसह अनोख्या घरांची वाढती मागणी यामुळे पुणे बाजारपेठ उत्तम कामगिरी बजावत असून रियल इस्टेट व्यवसायाला याठिकाणी चांगली चालना मिळत आहे. आमच्या पहिल्या व दुसऱ्या फेजला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, आम्हाला खात्री आहे की, रिटेल व व्यापारी जागांसह तिसऱ्या टप्प्याची कामगिरी देखील उत्तमच असेल.”
महिंद्रा हॅप्पीनेस्ट तथवडे मुंबई-पुणे महामार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून, अतिशय प्रतिष्ठित निवासी भाग आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये याचा समावेश होतो. हिंजवडीच्या आयटी हबपासून हा प्रकल्प जवळ आहे. अनेक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्स तसेच प्रस्तावित हिंजवडी मेट्रो स्टेशन येथून जवळ आहे. लाईफस्टाईल मॉल, पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांच्या भोवतीचा आगामी १७० किमी रिंग रोड अशा अनेक सुविधा नजीकच्या भविष्यकाळात उभारल्या जातील. जुना मुंबई-पुणे महामार्ग, पुणे-धुळे-नासिक महामार्ग, कासारवाडी आणि पिंपरी ही रेल्वे स्थानके, पिंपरी चौक बस स्टॉप, संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन जवळ असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय सोयीस्कर आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi