इक्वल (equal) ला मनोरंजन, क्रीडा आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रसिद्ध ५० पेक्षा जास्त व्यक्तिमत्वांचा पाठिंबा I
जीव्हीकेच्या (GVK) केशव रेड्डी यांनी इक्वल (equal) या भारतातील ओळख कागदपत्रांसह डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा व्यासपीठामध्ये (DPI platform) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली
~एक दशलक्ष भारतीय इक्वल (equal) वापरत आहेत; १०० दशलक्ष भारतीयांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे
~अमिताभ बच्चन, सलमान खान, एसएएस राजामौली, जूनियर एनटीआर, किआरा अडवाणी, ड्रिम स्पोर्ट्सचे सह संस्थापक हर्ष जैन, टायटन कॅपिटलचे सहसंस्थापक कुणाल बेहल, कोटक ८११ चे उपाध्यक्ष जे. कोटक, सानिया मिर्झा आणि पीव्ही सिंधू यांसारख्या ५० पेक्षा जास्त मनोरंजन, क्रीडा आणि व्यवसाय क्षेत्रातील विख्यात व्यक्तिमत्वांनी यांनी इक्वल (equal) ला पाठिंबा आणि उत्साह दाखविला आहे.
भारत, ऑगस्ट १६, २०२३: स्वातंत्र्य दिनानिमित्त जीव्हीकेचे (GVK) केशव रेड्डी आणि त्यांचे सहसंस्थापक राजीव रंजन यांनी भारतीयांना अगदी एका क्लिकने सुरक्षितपणे व सहजतेने आपले आयडी शेअर करण्यासाठी इक्वल (equal) यासंमतीला प्राधान्य देणारे व गोपनीयता केंद्रित डिजिटल व्यासपीठाची घोषणा केली. इक्वल (equal) हे इंडिया स्टेक या भारतातील प्रगत सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि (DPI platform) आणि डिजीलॉकर यांच्या सहभागीदारीमध्ये तयार केले आहे.
आधीच जवळपास एक दशलक्ष भारतीय बिटामध्ये इक्वल (equal) वापरत आहेत. आता हॉटेल्स, को वर्किंग स्पेस चेक इन्स, रीअल इस्टेटचे व्यवहार, कर्मचाऱ्यांची पडताळणी, कर्जासाठी पडताळणी, गृहनिर्माण वित्तपुरवठ्यासाठी पडताळणी, विम्याच्या क्लेमची पडताळणी, हॉस्पिटल चेकइन, वाहन खरेदी, कृषी संबंधित पडताळणी आणि डिजिटल खात्यांसंदर्भात चौकशी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधील आणि विविध परिस्थितींसाठी १०० दशलक्ष भारतीयांना सक्षम करण्याचे इक्वल (equal) चे ध्येय आहे. व्हाइट कॉलर नोकरदार वर्गापासून ब्लु कॉलर कामगार वर्गापर्यंत, शेतकरी, ग्राहक आणि कर्जदार अशा निरनिराळ्या गटातील सर्वांना त्यांची वैयक्तिक ओळख कागदपत्रे व अन्य दस्तावेज उत्तम प्रकारे व्यवस्थापित करण्यास सहाय्य करून त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची इक्वल (equal) ची आकांक्षा आहे.
इक्वल (equal) वापरकर्त्यांना सरकारी ओळख कागदपत्रे, पॅन कार्ड, ड्रायव्हर्स लायसन्स, आरोग्य आणि आर्थिक विषयक नोंदी आणि आपले अन्य बरेच रेकॉर्ड संग्रहित करून त्यांना व्यवस्थापित व शेअर करण्यासाठी एक सुरक्षित, संमतीला प्राधान्य देणारे व गोपनीयता व सुरक्षितता देणारे व्यासपीठ प्रदान करते.
इक्वल (equal) चे संस्थापक श्री. केशव रेड्डी म्हणाले, “भारतातील १०० दशलक्ष एवढ्या मोठ्या लोकसंख्येला संधी उपलब्ध होण्यासाठी, काही ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी, महत्त्वाच्या कामांसाठी जेव्हा ओळखपत्रे व महत्त्वपूर्ण कागदपत्राविषयीच्या बाबतीत दररोज भेडसावणाऱ्या अडचणींना मांडणे हे इक्वल (equal) च्या मागील तत्वज्ञान आहे. लोकांची महत्त्वाची कागदपत्रे घरात पलंगाजवळच्या खणामध्ये, कपाटांमध्ये, किंवा इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये क्लाउड ड्राइव्हवर असे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात. म्हणूनच इक्वल (equal) चे उद्दिष्ट हे आहे की, वापरकर्त्यांना आवश्यक तेव्हा कोठेही, कधीही एखाद्या एकसंध व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांची ओळख कागदपत्रे सुरक्षितपणे व सहजतेने शेअर करता यावीत व त्यांच्या हातात पूर्ण नियंत्रण असावे. डेटा गोपनीयतेच्या सुरक्षेमध्ये एक सुवर्ण मानक मानले जात असतानाच, आम्ही यास वैयक्तिक ओळख कागदपत्रे व्यवस्थापित करण्यामध्ये भारतात आलेली एक क्रांतीच मानतो.”
लॉंच दिनाच्या वेळेसच इक्वल (equal) ला मनोरंजन, क्रीडा आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रसिद्ध ५० पेक्षा जास्त व्यक्तिमत्वांचा पाठिंबा मिळाला. सिनेमा जगतातील अमिताभ बच्चन, सलमान खान, एसएएस राजामौली, जूनियर एनटीआर, वरुण धवन, किआरा अडवाणी, शाहिद कपूर, अलू अर्जुन, राणा दगुबती, सोनंम कपूर आहुजा, समंता प्रभू, तमन्ना भाटिया, नीना गुप्ता, रविण टंडन यांनी समाज माध्यमांमधून इक्वल (equal) ला शुभेच्छा देत त्याच्या वेटलिस्ट मध्ये सामील होण्यासाठी उत्सुकता व उत्साह दाखविला. व्यवसाय व स्टार्ट अप क्षेत्रातील ड्रिम स्पोर्ट्सचे सह संस्थापक हर्ष जैन, टायटन कॅपिटलचे सहसंस्थापक कुणाल बेहल, कोटक ८११ चे उपाध्यक्ष जे. कोटक, स्काय फ्लो- डेटा प्रायव्हसी वॉल्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंशू शर्मा तर क्रीडा जगतातील सानिया मिर्झा आणि पीव्ही सिंधू यांनी सार्वजनिकपणे या व्यासपीठाला आपला पाठिंबा दर्शवून शभेच्छा दिल्या.
इक्वल (equal) ने प्रतीक्षा यादी (वेट लिस्ट) त्यांच्या www.equal.in या संकेत स्थळावर जाहीर केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना या व्यासपीठाचा अनुभव घेणाऱ्यांमध्ये प्रथम स्थानावर राहता येईल.
अधिक माहितीसाठी या मेल आयडी वर संपर्क साधा: media@equal.in
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi