घरांच्या विक्रीत वाढ I
घरांच्या विक्रीत वाढ
मालमत्ता नोंदणीत वाढीमुळे सर्व राज्यांकडून महसूल संकलनात वाढ
मालमत्ता विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्व राज्य सरकारांना महसूल संकलनात वाढ झाली आहे. २७ राज्ये व १ युनिअन टेरिटरी जम्मू काश्मीर यांकडून स्टॅम्प ड्युटी व रेजिस्ट्रेशन चार्जेस माध्यमातून २०२१-२२ आर्थिक वर्षात एकूण महसूल संकलन रु.१.७१/- लाख कोटी हुन अधिक झाले आहे. मागील वर्षीचे तुलनेत त्यात ३४% ची वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात सरासरी मासिक जमा रक्कम रु.१४,२६२/- कोटी असून मागील वर्षी हि रक्कम रु. १०,६४६/- कोटी होती.महाराष्ट्रात सर्वाधिक कलेक्शन झाले असून हि रक्कम रु.३५,५९३/- कोटी आहे. २०२२ आर्थिक वर्षात राहत्या घरांच्या मागणीत व खरेदी विक्रीत वाढ झाली आहे. व पुढील वर्षी देखील हि मागणी वाढेल अशी माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस चे मुख्य अर्थ तज्ञ् ,निखिल गुप्ता म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo