गोदरेजकडून ‘हर घर सुरक्षित २०२५’ उपक्रमाचा प्रारंभ

लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्यूशन्ल हा गोदरेज एन्टरप्रायजेसच ग्रुपचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. गेल्या आठ वर्षांपासून लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्सकडून ‘हर घर सुरक्षित’ हा उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केला जात आहे. यंदा या उपक्रमाचे 9 वे पर्व आहे. आठव्या आवृत्तीच्या निमित्ताने लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्यूशन्स यांनी व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची विस्तार योजना जाहीर केली आहे. हा विस्तार एलएएसच्या स्मार्ट होम सेगमेंटमध्ये जलद गतीची वाढ साधण्याची आक्रमक योजना दर्शवतो. या योजनेत डिजीटल लॉक्सच्या विस्तृत श्रेणीमध्ये दहापट वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवते. देशातील मोठ्या स्तरातील प्रीमीयम ग्राहकांना स्मार्ट सुरक्षा उपाय मिळण्याकरिता हा ब्रँण्ड आता त्यांच्या मेड इन इंडिया डिजीटल लॉक्सच्या श्रेणीमध्ये डिझाइन आणि किमतीच्या नावीन्यतेवर लक्ष केंद्रित करत आहे. गोदरेजने डिजीटल लॉक्सच्या विभागात ३६ टक्के वार्षिक चक्रवाढ नोंदवली आहे. या उल्लेखनीय वाढीमुळे लॉक्स एण्ड आर्किटेक्टरल ही कंपनी बाजारात आघाडीच्या स्थानावर पोहोचली आहे. 

‘हर घर सुरक्षित’ या उपक्रमाचा भाग म्हणून कंपनीने नुकतेच ‘अपघाती आमंत्रण एप्लिकेशन’ या डिजीटल एप्लिकेशनचे अनावरण केले. वापरकर्त्यांनी सोशल मिडीयावर आपली वैयक्तिक माहिती गरजेपेक्षा जास्त शेअर केल्यास घराच्या सुरक्षिततेला कितपत धोका निर्माण होऊ शकतो, याबद्दल हे एप्लिकेशन माहिती देते. हे एप्लिकेशन मेटाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. वापरकर्त्यांच्या माहितीचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अपघाती आमंत्रणासंबंधित स्कोर दिला जातो. सोशल मिडीयावर वापरकर्ताय कितपत सक्रीय आहे, त्या आधारावर खास सूचनाही दिल्या जातात. ही मोहिम पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. या मोहिमेतून जागरुकता घडवण्यासाठी वास्तविक जीवनातील घटनांचाही संदर्भ देण्यात आला आहे. आजच्या डिजीटल युगात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी सजग आणि जबाबदार वर्तनातूनच मिळते.

गेल्या पाच वर्षांत भारतात सोशल मिडीयाशी संबंधित सायबर गुन्ह्यांध्ये जवळपास तिप्पटीने वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्यांचे जाळे वाढत असल्याने प्रत्येकाने आपल्या डिजीटल सुरक्षिततेकडे काटोकोरपणे लक्ष द्यावे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोदरेजने नव्या डिजिटल लॉक्सची नवी श्रेणी बाजारात आणली आहे. हे श्रेणी किफायतशीर दरात उपलब्ध आहे. निओ डिजीटल लॉक्स हे संपूर्णपणे नवीन रेंज आहे. आधुनिक भारतीय घरांच्या सुरक्षिततेसाठी ही कल्पक पायरी मानली जाते. आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि किफायतशीर दर यांचा संगम असलेल्या या लॉक्समध्ये इन-बिल्ट व्हिडिओ डोअर फोन, वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, विविध प्रवेश पद्धती, चोरी होण्यापूर्वीचा अलार्म आणि आपत्कालीन पॉवर बॅकअप यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. ही रेंज ८ हजार ९९९ रुपयांपासून उपलब्ध होते. ही निओ रेंज विविध सोयीसुविधांसह सुरक्षा आणि स्टाईल शोधणा-या शहरी ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.

या नव्या डिजीटल श्रेणीविषयी गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपचे एलएएस विभागाचे व्यापार प्रमुख श्याम मोटवानी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “गेल्या आठ वर्षांपासून हर घर सुरक्षित उपक्रमाद्वारे आम्ही घरगुती सुरक्षिततेला सामूहिक जबाबदारी म्हणून निभावत आहोत. आता अपघाती आमंत्रण एप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही ही मोहिम डिजीटल क्षेत्रातही विस्तारत आहोत. निओ डिजिटल लॉक्स रेंजचे लोकार्पण हे आधुनिक भारतीय घरांसाठी बुद्धिमान सुरक्षिततेची नवी व्याख्या देणारे आणि स्मार्ट होम श्रेणीती वेगाने वाढणारे महत्त्वाचे पाऊल आहे. ” 

गोदरेजची हर घर सुरक्षित मोहिम घरगुती सुरक्षिततेच्या उपायांबद्दल जागरुकता वाढवत आहे. ही मोहिम ग्राहकांना स्मार्ट सुरक्षा उपायांचा वापर वाढवा, असे आवाहन करत आहे. आजपर्यंत १.७ लाखाहून अधिक घरांमध्ये या मोहिमेच्या पुढाकारातून सुरक्षित तपासण्या झाल्या आहेत. यंदाच्या आर्थिक वर्ष २०२६मध्ये २१ हजारांहून अधिक तपासण्या झाल्या आहेत. या प्रयत्नांमुळे दरवर्षी दोन अंकी वाढीचा विक्रम नोंदवला जात आहे. गेल्या वर्षी डिजीटल सुरक्षा उपायांचा स्वीकार तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. ही वाढ लक्षात घेता गोदरेज घरगुती सुरक्षिततेमध्ये आपले अस्तित्व सक्षम नेतृत्वासह मजबूत करत आहे.

Mr. Shyam Motwani at Har Ghar Surakshit Event
Mr. Shyam Motwani at Har Ghar Surakshit Event

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *