गोदरेज प्रॉपर्टीजने मुंबईतील कारमायकेल रोड येथे दिमाखदार निवासी प्रकल्प उभारण्यासाठी जमीन अधिग्रहित केली I

गोदरेज प्रॉपर्टीजने मुंबईतील कारमायकेल रोड येथे दिमाखदार निवासी प्रकल्प उभारण्यासाठी जमीन अधिग्रहित केली.

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: GODREJPROP) या भारतातील एका आघाडीच्या स्थावर मालमत्ता विकासक कंपनीने मुंबईतील उच्चभ्रू निवासी भाग मानल्या जाणाऱ्या कारमायकेल रोड जवळ एक शानदार निवासी प्रकल्प उभारण्यासाठी जमीन अधिग्रहित केली असल्याची घोषणा आज केली.

जवळपास ०.५ एकरची ही साईट भारतातील एका सर्वात प्रतिष्ठित आणि इथे घर असावे ही अनेकांची महत्त्वाकांक्षा आहे अशा ठिकाणी आहे. करम चंद थापर (केसीटी) ग्रुपकडून ही जमीन विकत घेण्यात आली आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ श्री. मोहित मल्होत्रा म्हणाले, “अतिशय प्रतिष्ठित ठिकाणच्या प्रकल्पाचा आमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात लक्झरी निवासी प्रकल्पांची मागणी वाढली आहे. लक्झरी निवासी विकास क्षेत्रात महत्त्वाचा मापदंड निर्माण करण्याची संधी या ठिकाणामुळे आम्हाला मिळाली आहे.”

केसीटी ग्रुपचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. वरुण थापर यांनी सांगितले, “दक्षिण मुंबईतील अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जमीन गेली जवळपास सात दशके केसीटी ग्रुपची रिअल इस्टेट कंपनी इंडियन सिटी प्रॉपर्टीज लिमिटेडच्या मालकीची होती. या जमिनीसाठी खरेदीदार शोधताना ते आमची मूल्ये आणि कॉर्पोरेट नैतिकता यांना अनुरूप असणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. गोदरेज प्रॉपर्टीजसोबत हा सर्व व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”

*सध्याच्या व्यावसायिक गृहीतकांच्या आधारे.

Mr Mohit Malhotra-MD & CEO-Godrej Properties Ltd
Mr Mohit Malhotra-MD & CEO-Godrej Properties Ltd

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *