गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स मुंबईतील गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी महत्त्वाची जबाबदारी निभावत आहे I
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स मुंबईतील गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी महत्त्वाची जबाबदारी निभावत आहे.
~ गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने मुंबईतील प्रमुख गणेश मंडपांना कव्हर करणारे ३०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, यामध्ये भक्तांना ज्यांची सर्वात जास्त ओढ असते असे ‘लालबागचा राजा‘, ‘मुंबईचा राजा – गणेशगल्ली‘, ‘चिंतामणी‘ यांचा समावेश आहे. ~
मुंबई, ३० ऑगस्ट २०२२: गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे एक बिझनेस युनिट गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने (जीएसएस) ‘डीकोडिंग सेफ अँड साउंड: इन द इंडियन कॉन्टेक्स्ट‘ हे सर्वेक्षण नुकतेच केले. सुरक्षेसाठीच्या सुविधा, उपाययोजना याकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन कसा आहे ते या सर्वेक्षणात समजून घेण्यात आले आहे. गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या या सर्वेक्षणात मुंबईतून सहभागी झालेल्यांपैकी ४४% लोकांच्या मते स्वतःचे आणि प्रियजनांचे आरोग्य व्यवस्थित असणे म्हणजे ‘सुरक्षित व सुखरूप‘ असणे आहे. हाच विषय पुढे नेत आणि सुरक्षेच्या मूलभूत मूल्यांना अनुसरून यंदाच्या वर्षी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स मुंबईतील गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने मुंबईतील अनेक प्रमुख गणेश मंडपांमध्ये ३०० पेक्षा जास्त सिक्युरिटी/सीसीटीव्ही कॅमेरे, २ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स, हातात धरून वापरावयाचे ४ मेटल डिटेक्टर्स इन्स्टॉल केले आहेत. भक्तांची सर्वाधिक ओढ ज्याठिकाणी असते असे ‘लालबागचा राजा‘, ‘मुंबईचा राजा – गणेशगल्ली‘, चिंतामणी यांचा यामध्ये समावेश आहे. अशाप्रकारे मंडपांमध्ये सुरक्षितता राखण्यात आयोजकांना महत्त्वाची मदत करण्याचे काम गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स करत आहे.
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे बिझनेस हेड श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “भारतातील अनेक भागांमध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण गणेशोत्सवाची जी शान आणि जो उत्साह मुंबईमध्ये असतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. या काळात देशभरातील भाविक आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई अग्निशामक दल, वाहतूक नियंत्रण विभाग, मुंबईतील बस सेवा – बेस्ट, सैन्य दल आणि अशा इतर अनेक विभागांनी गणेशोत्सवासाठी केलेली तयारी या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे. गणेशभक्तांना हा उत्सव सुखासमाधानाने साजरा करता यावा यासाठी हे अनेक कर्मचारी अथक मेहनत घेत असतात. आम्हाला खात्री आहे की आम्हा सर्वांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यावर्षीचा गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडेल. गेली दोन वर्षे महामारीच्या विरोधात दिलेल्या लढ्यानंतर यावर्षी मुंबई शहर आपला एक सर्वात लाडका सण साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे, आम्ही देखील यामध्ये सहभागी होऊन गणेश मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व नियंत्रण सुविधा इन्स्टॉल करत आहोत. गणेशभक्तांच्या आनंदात व समाधानात कुठेही कसूर राहू नये हा आमचा उद्देश आहे.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi