गोदरेज प्रॉपर्टीजने मुंबईतील दोन प्रकल्प सादरीकरणामधून १,२०० कोटी रुपायांहून जास्त विक्री केली साध्य I
गोदरेज प्रॉपर्टीजने मुंबईतील दोन प्रकल्प सादरीकरणामधून १,२०० कोटी रुपायांहून जास्त विक्री केली साध्य
(ठाण्यातील गोदरेज असेंड आणि दादर-वडाळ्यातील गोदरेज होरायझनने ८ लाख चौरस-फूट क्षेत्रफळ असलेल्या ठिकाणी ७०० हून अधिक घरांची विक्री नोंदवली आहे.)
मुंबई, १६ सप्टेंबर २०२२: भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL) (BSE scrip id: GODREJPROP) ने एकाचवेळी सादर केलेल्या त्यांच्या दोन नवीन प्रकल्पांमधून १,२१० कोटी रुपये किमतीची विक्रमी विक्री केल्याचे आज जाहीर केले. ठाणे येथील कोलशेत रोड वरील गोदरेज असेंड प्रकल्प आणि दादर – वडाळा, मुंबई येथे स्थित गोदरेज होरायझन असे हे दोन प्रकल्प आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीत सादर केलेल्या दोन्ही प्रकल्पांसाठी ८.०८ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर असलेल्या ७०० हून अधिक घरांची एकत्रितपणे विक्री केली आहे.
गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा म्हणाले, “गोदरेज असेंड आणि गोदरेज होरायझनला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही आनंदी आहोत. मुंबई ही आमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे आणि ग्राहकांचा विश्वास म्हणजे नामांकित विकासकांद्वारे एकात्मिक विकास आणि शाश्वततेला असलेल्या वाढत्या मागणीचे प्रतिबिंब आहे. आम्ही या प्रकल्पांतील सर्व रहिवाशांसाठी एक उत्कृष्ट प्रकल्प वितरित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.”
मे २०२२ मध्ये सादर केलेला गोदरेज असेंड हा ठाणे येथे कोलशेत रोड वर स्थित एक निवासी प्रकल्प असून तिथे चांगल्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी आहे. गोदरेज होरायझन हा दादर-वडाळा येथे फाइव्ह गार्डन्सजवळील आर.ए. किडवाई रोड येथील एक निवासी प्रकल्प आहे. शाळा, रुग्णालये, उद्याने तसेच नामांकित रेस्टॉरंट्स यांसारख्या सर्व प्रमुख सामाजिक पायाभूत सुविधांच्या जवळ असलेला हा प्रकल्प आहे.
About Godrej Properties Limited
Godrej Properties brings the Godrej Group philosophy of innovation, sustainability, and excellence to the real estate industry. Each Godrej Properties development combines a 125-year legacy of excellence and trust with a commitment to cutting edge design, technology, and sustainability. In FY 2021, Godrej Properties emerged as the largest developer in India by the value and volume of residential sales achieved. Godrej Properties has deeply focused on sustainable development. In 2010, GPL committed that all of its developments would be third party certified green buildings. In 2020 and again in 2021, the Global Real Estate Sustainability Benchmark ranked GPL #1 globally amongst listed residential developers for its sustainability and governance practices. In 2017, GPL was one of the founding partners of the Sustainable Housing Leadership Consortium (SHLC), whose mission is to spread sustainable development practices across the Indian real estate sector. In recent years, Godrej Properties has received over 300 awards and recognitions, including the Porter Prize 2019, The Most Trusted Real Estate Brand in the 2019 Brand Trust Report, Builder of the Year at the CNBC- Awaaz Real Estate Awards 2019, and The Economic Times Best Real Estate Brand 2018.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi