गोदरेज लॉक्स ५२ ठिकाणे ५२ आठवडे सुरक्षित ठेवणार I

गोदरेज लॉक्स ५२ ठिकाणे ५२ आठवडे सुरक्षित ठेवणार

  • घर सुरक्षितता दिवसाच्या निमिताने गोदरेज लॉक्सने एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे ज्यामुळे नागरिकांना घराची सुरक्षा अधिक सहजसोप्या पद्धतीने करता येईल.
  • नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोनुसार घरफोडी आणि इतर गुन्हे घडण्याची दाट शक्यता असलेली ५२ ठिकाणे निवडली जाणार.

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२२: विश्वास, गुणवत्ता आणि सुरक्षितता यांचे दुसरे नाव म्हणून ओळखला जाणारा ब्रँड गोदरेज लॉक्सने १५ नोव्हेंबर रोजी घर सुरक्षितता दिवस अतिशय आगळीवेगळ्या पद्धतीने साजरा केला. या दिवसाचे औचित्य साधून गोदरेज लॉक्सने लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीया उपक्रमाची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षीच्या ‘#GoLiveFreely’ या अभियानाला अनुसरून गोदरेज लॉक्सने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सर्वाधिक असुरक्षित १० शहरांमध्ये ५२ ठिकाणी ५२ आठवडे घर सुरक्षितता जागरूकता अभियान चालवले जाणार आहे. नागरिकांना घराच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक बनवण्यासाठी गोदरेज लॉक्सने सुरु केलेल्या हर घर सुरक्षितया राष्ट्रव्यापी जनजागृती अभियानाला घर सुरक्षितता दिनी चार वर्षे पूर्ण झाली आहेत.

नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेबाबत जाणीवपूर्वक विचार करणे आणि घरफोडी, चोरी अशा धोक्यांपासून सुरक्षित राहणे गरजेचे असल्याचे या ब्रँडला जाणवले. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या २०२१ च्या आकडेवारीनुसार, निवासी भागांमध्ये चोरी, दरोड्यांचे प्रमाण २०२० च्या तुलनेत १७% नी वाढले. हाच संदर्भ घेऊन हा ब्रँड भारतातील दिल्ली, मुंबई, भुवनेश्वर, जयपूर, लखनौ, बंगलोर, चंदीगढ, भोपाळ, अहमदाबाद आणि पाटणा या दहा सर्वाधिक असुरक्षित शहरांमध्ये ५२ ठिकाणे निश्चित करेल. लोकांना या उपक्रमात सहभागी करवून घेऊन घरांची सुरक्षितता मजबूत केली जावी आणि लोकांना सुरक्षा सुविधा व उत्पादनांची माहिती मिळावी, ती थेट उपलब्ध व्हावीत हा यामागचा उद्देश आहे.

मुंबईचे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस श्री. पुरुषोत्तम कराड आणि लोकप्रिय मालिका ‘सीआयडी’ मधील इन्स्पेक्टर दयानंद शेट्टी यांच्या उपस्थितीत गोदरेज लॉक्स ब्रँडने आपल्या घर सुरक्षितता उपक्रमाची घोषणा केली.  यावेळी पार पडलेल्या एका पॅनेल चर्चेमध्ये उपस्थितांनी भर दिला की, घराच्या सुरक्षिततेसाठी सर्वाधिक विश्वसनीय वस्तू असते कुलूप आणि तरीही त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. घरफोडी, दरोडे यासारख्या धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत त्याची माहिती देखील यावेळी दिली गेली.

गोदरेज लॉक्सचे बिझनेस हेड श्री. श्याम मोटवानी यांनी सांगितले, “घर सुरक्षितता दिनी, ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीउपक्रमाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  दरोडे आणि चोरीच्या सर्वाधिक घटना जिथे घडतात अशी ५२ ठिकाणे निवडून भारतभरामध्ये सुरक्षितता विषयावर जागरूकता घडवून आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सुरक्षितता हे ज्याचे दुसरे नाव आहे, असा समृद्ध परंपरेचा वारसा चालवणारा ब्रँड गोदरेज लॉक्स या शहरांमधील नागरिकांसाठी निःशुल्क होम सेफ्टी असेसमेंट्स करून देईल. या अनोख्या सुविधेमुळे नागरिकांना सुरक्षा मानके समजून घेता येतील आणि घराच्या सुरक्षिततेमध्ये काही कमतरता असल्यास त्या दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करता येतील. सुधारणा करण्याची खरोखरीच जिथे गरज आहे तिथे जाऊन पोहोचावे आणि घर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करावी ही या उपक्रमामागील संकल्पना आहे. त्यामुळे ५२ आठवड्यांची वेळ आखून घेऊन या भागांची सुरक्षितता करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” 

त्यांनी पुढे असेही सांगितले,सर्वसामान्यांसाठी घरफोडी आणि दरोडे या आजही खूप गंभीर समस्या आहेत. एनसीआरबीकडील माहितीनुसार, २०२० सालापासून दरोड्यांच्या प्रमाणात १७% ची वाढ झाली आहे जी गंभीर आहे. घर सुरक्षितता क्षेत्रातील एक जबाबदार आणि विश्वसनीय ब्रँड म्हणून, आम्ही प्रत्येक भारतीयाला घराच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करू इच्छितो, यासाठी आम्ही हर घर सुरक्षित हा उपक्रम राबवत आहोत आणि आमचे हे प्रयत्न भविष्यातही सुरु राहतील.”

लोकप्रिय मालिका सीआयडीमधील प्रसिद्ध टीव्ही स्टार दयानंद शेट्टी म्हणाले,कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेतील एका अधिकाऱ्याची भूमिका करत असताना मला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षितता किती महत्त्वाची आहे ते ठामपणे समजले.  गोदरेज लॉक्सच्या उपक्रमाचे मी कौतुक करतो आणि हर घर सुरक्षितमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हा मी माझा सन्मान मानतो. सुरक्षिततेच्या मार्गातील अडथळ्यांबाबत लोकांनी अधिक जास्त जागरूक असले पाहिजे, तसेच भारत अधिक जास्त सुरक्षित बनवण्यासाठी व्यक्तिगत सुरक्षेमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग देखील त्यांना माहिती असले पाहिजेत.”

Dayanand Shetty aka ‘Senior Inspector Daya' ‘CID’ spoke about home safet...
Dayanand Shetty aka ‘Senior Inspector Daya’ ‘CID’ spoke about home safet…

सर्व ५२ ठिकाणी, गेटेड कम्युनिटीजमध्ये सेफ्टी बूथ उभारले जातील, लोकांना त्याठिकाणी थांबून सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्याबाबत माहिती घेता येईल, घरात कोणी नसताना घर सुरक्षित कसे ठेवावे याबाबत सूचना, सल्ला मिळवता येईल. बूथवर नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना होम सेफ्टी चेकअपची सुविधा निःशुल्क पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. एक सुरक्षितता तज्ञ नेमून लोकांना घर सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व पटवून द्यावे हा कंपनीचा उद्देश आहे.

प्रगत डिजिटल लॉक्ससाठी एक आधुनिक सुविधा गोदरेज लॉक्सने लोकांना मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य आणि आश्वासन देऊन मनःशांती मिळवून दिली आहे. घरी कोणी नसताना गोदरेज लॉक्स घराच्या सुरक्षिततेची काळजी घेतात.  ताणतणाव न घेता मुक्तपणे जगा हा गोदरेज लॉक्सचा सिद्धांत आहे, घरांच्या सुरक्षिततेबाबत आधुनिक जागरूक विचारांचे नेतृत्व आणि आत्मविश्वास देखील कंपनी आपल्या उपक्रमांमधून अधोरेखित करते.

Shyam Motwani, Business Head at Godrej Locks Interact with Dayanand Shet...
Shyam Motwani, Business Head at Godrej Locks Interact with Dayanand Shet…

***

About Godrej Locks:

Godrej Locks is a 125-year-old leading manufacturer of innovative locking devices. Since its inception in 1897 by Ardeshir Godrej, the name ‘Godrej’ has become synonymous with trust, protection and integrity. From the first Anchor branded lock in 1897 to the first ever spring less lock in 1907, to the iconic ‘Nav-Tal’ in 1954, and to the postmodern biometric locks, Godrej has set every benchmark in the locks industry. Over the years, Godrej Locks have changed in form, function and scope of application. But one thing still remains the same – the solid stamp of trust and reliability. Godrej Locks & Architectural Fittings and Systems adhere to global quality norms and hold ISO 9001, ISO 14001 and OHSAS 18001 certifications.

Beyond Locking Solutions, the brand also caters to Architectural Fittings and Systems, creating innovative, premium, comprehensive hardware solutions. The range which consists of door, furniture and glass fittings has been designed to fit perfectly into today’s hi-tech residential and commercial establishments. Most products cater to needs for safety, privacy, fire & smoke checks and energy saving with ease. These devices meet international quality standards like UL Rating, EN Rating, CE Certification and fire-rated.

The Kitchen Fittings by Godrej Locks & Architectural Fittings and Systems includes SKIDO, i.e. Smart Kitchen Drawers & Organisers – an innovative range of smart kitchen storage solutions, designed in India to meet the unique requirements of the Indian kitchen. The Godrej Cartini range of knives- showcase cutting-edge design, a fine quality blade and the highest level of durability. These premium kitchen and hobby equipment range are also made in India, to suit home and professional needs. The brand has come a long way in delivering world-class smart locking solutions. For more information, please log on to https://www.godrej.com/godrej-locking-solutions-and-systems.

Godrej Locks is a business unit of Godrej & Boyce Mfg. Co. Ltd

Godrej Locks
Mr. Shyam Motwani, Mr. Purushottam Karad DCP, Mr. Dayanand Shetty

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *